चांदवड जवळ चंदन तस्करी करणाऱ्या टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 18:47 IST2019-05-05T18:46:10+5:302019-05-05T18:47:08+5:30
चांदवड जवळ मंगरुळ टोलनाक्यावर चंदन तस्करी करणाºया टोळीला अटक करण्यात आली. मालेगाव येथून बेकायदेशीरपणे चंदनाची तस्करी करताना तिघांना अटक केली. नाशिक विशेष गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई करत तीन लाख रु पये किंमतीच्या चंदनासह दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चांदवड जवळ चंदन तस्करी करणाऱ्या टोळीला अटक
चांदवड : चांदवड जवळ मंगरुळ टोलनाक्यावर चंदन तस्करी करणाºया टोळीला अटक करण्यात आली. मालेगाव येथून बेकायदेशीरपणे चंदनाची तस्करी करताना तिघांना अटक केली. नाशिक विशेष गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई करत तीन लाख रु पये किंमतीच्या चंदनासह दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत मिळालेली अधिक माहीती अशी की,‘सिल्वासा येथील एका कंपनीत बेकायदेशीररित्या चंदन घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचुन केलेल्या कारवाईत एका कारमधून चंदनाची तस्करी करणाºया तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्या तिघांकडून तीन लाख रूपये किंमतीचे १९४ किलो चंदन, सात लाख रूपये किंमतीची गाडी असा एकूण दहा लाख रु पयांचा मुद्देमाल नाशिक विशेष गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती मिळत आहे.