शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पाचशे-हजार रुपयांच्या नोटांना मंदिराच्या दानपेटीत मनाइ

By admin | Updated: November 11, 2016 00:19 IST

पाचशे-हजार रुपयांच्या नोटांना मंदिराच्या दानपेटीत मनाइ

पंचवटी : केंद्र सरकारने मोठ्या नोटा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा फटका सर्वसामान्यांबरोबरच देवादिकांना बसला आहे. नाशिकमधील प्रमुख मंदिरांमध्ये दानपेटीत नोटा टाकण्याचे आणि देणगी देण्याचे प्रमाण घटले आहे. विशेष म्हणजे कपालेश्वर मंदिरात तर मंदिर व्यवस्थापनाने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याचा फलक झळकविला आहे.काळा पैसा, बनावट नोटा आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासनाने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने त्याचा परिणाम मंदिरातील देणगी रकमेवर झाला आहे. मागील दोन दिवसांपासून नाशिकला पंचवटीत देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावली आहे. नाशिकला दररोज शेकडो भाविक श्री काळाराम मंदिर, कपालेश्वर, सीतागुंफा, रामकुंड येथे येत असतात. मात्र मागील दोन दिवसांपासून केवळ बोटावर मोजता येतील इतकेच भाविक मंदिरात दिसून येत आहे. देवदर्शन करण्यासाठी येणारे भाविक मोठ्या प्रमाणात मंदिरात देणगी देत असतात, मात्र दोन दिवसांपूर्वी शासनाने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने त्याचा परिणाम देणगी रकमेवर झाला आहे. नाशिकच्या श्री कपालेश्वर मंदिर व्यवस्थापनाने भाविकांनी दानपेटीत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा टाकू नये, असा फलक लिहून पाचशे व एक हजार रुपयांची देणगी स्वीकारण्यास नकार दर्शवला आहे. दुसरीकडे श्री काळाराम मंदिरात येणारे भाविकदेखील रोख स्वरूपात मंदिरात देणगी पावती फाडत नसल्याने देणगी रकमेत घट झाली असल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने देवदेवतांच्या देणगी रकमेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)