स्कूटीवरून आलेल्या चोरट्यांनी सोन्याची पोत खेचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 01:51 IST2022-02-26T01:51:08+5:302022-02-26T01:51:33+5:30

सिडको, प्रसादनगर भागात एका महिलेच्या गळ्यातील सुमारे अडीच लाख रुपयांची सोन्याची पोत माेपेड स्कूटीवरून आलेल्या चोरट्यांनी ओरबाडून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Thieves from Scooty grabbed the gold vessel | स्कूटीवरून आलेल्या चोरट्यांनी सोन्याची पोत खेचली

स्कूटीवरून आलेल्या चोरट्यांनी सोन्याची पोत खेचली

नाशिक : सिडको, प्रसादनगर भागात एका महिलेच्या गळ्यातील सुमारे अडीच लाख रुपयांची सोन्याची पोत माेपेड स्कूटीवरून आलेल्या चोरट्यांनी ओरबाडून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी दिलीप पगार (४५, मधुबन अपार्टमेंट, प्रसादनगर, उत्तमनगर, सिडको) यांच्या तक्रारीनुसार अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पल्लवी पगार या एका हळदीचा कार्यक्रम आटोपून प्रसादनगर भागातून घरी परत जात असताना पांढऱ्या रंगाच्या माेपेड स्कूटीवरून आलेल्या भामट्यांनी पगार यांच्या गळ्यातील सोन्याचे ६ तोळ्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Thieves from Scooty grabbed the gold vessel