शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

सायखेड्यात बंद घरांवर चोरांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 6:41 PM

दिवाळीनिमित्त बंद घरांचा शोध घेऊन अज्ञात चोरट्यांनी सायखेडा येथील कॉलेजरोड लगत असलेल्या हिमालय सोसायटीमध्ये बंद असलेल्या संतोष भुसे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील दोन टीव्ही, दोन मोटारसायकली, काही कपडे चोरून दिवाळीचा फायदा घेऊन पलायन केले. भर वस्तीत चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देनागरीकांमध्ये घबराट दोन दुचाकींसह टीव्ही, कपड्यांची चोरी

सायखेडा : दिवाळीनिमित्त बंद घरांचा शोध घेऊन अज्ञात चोरट्यांनी सायखेडा येथील कॉलेजरोड लगत असलेल्या हिमालय सोसायटीमध्ये बंद असलेल्या संतोष भुसे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील दोन टीव्ही, दोन मोटारसायकली, काही कपडे चोरून दिवाळीचा फायदा घेऊन पलायन केले. भर वस्तीत चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.हिमालय सोसायटीत मध्यवर्ती डॉ. आबा पाटील यांच्या घरात सोनगाव येथील प्राथमिक शिक्षक संतोष भुसे भाडेकरू म्हणून राहतात. भाऊबिजेच्या निमित्ताने ते दुपारी बारा वाजता सिन्नर येथे बहिणीकडे गेले होते. पत्नी, मुले घरी नसल्याने त्यांनी घराला कुलूप लावले होते. रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरांनी गेटची कडी तोडून आत प्रवेश केला. मुख्य दरवाज्याच्या कडीत लोखंडी गज घालून कडी तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट, कोठी यातील सामान अस्ताव्यस्त केले. घरात कोणताही ऐवज मिळाला नाही. घरातील दोन टीव्ही आणि काही कपडे घेतले. घराच्या अंगणात लावलेल्या हिरो होंडा कंपनीची पॅशन रंग लाल आणि पांढऱ्या रंगाची मॅक्सो मोपेड हिरो या दोन गाड्या घेऊन पोबारा केला. आजच्या मूल्यांकनानुसार ६८ हजार रु पयांची चोरी झाल्याचे तक्र ारीत म्हटले आहे. सकाळी दूधवाला नितीन खालकर आल्यानंतर त्याने गेट तोडलेले पाहिल्याने संतोष भुसे यांना दूरध्वनी करून सर्व माहिती कळविली. भुसे तत्काळ दाखल झाले. सायखेडा पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी भेट देऊन सदर चोरीचा पंचनामा केला. श्वान पथक बोलावून माग काढण्यात आले असता कॉलेज रोडने चोरटे पळाल्याचे प्रथम तपासात लक्षात आले आहे. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी