शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

पीपीई सूट घालून चोरट्यांनी फोडले ज्वेलरी शॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 7:53 PM

नाशिक : शहर व परिसरातील बॅँका, सराफी दुकाने, गुदामे चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील टाकळीरोडवरील ...

ठळक मुद्देसुदैवाने दोन्ही दुकानातून काहीही चोरी झाले नाहीग्रील कापले, सीसीटीव्ही फोडले

नाशिक : शहर व परिसरातील बॅँका, सराफी दुकाने, गुदामे चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील टाकळीरोडवरील मोहिनीराज ज्वेलर्स हे दुकान गुरुवारी (दि.१३) सकाळी सहा वाजेच्या सुमारास दोघा चोरट्यांनी मोटारीतून पीपीई सूट घालून येत दुकानाच्या संरक्षणासाठी लावलेले लोखंडी ग्रील तोडले. त्यानंतर चोरट्यांनी शटर उचकटून दुकानात प्रवेश केला; मात्र लॉकर फोडता आले नाही आणि रस्त्यांवर नागरिकांचा वावर असल्याचे लक्षात आल्यानंतर चोरटे फरार झाले. अशाच पध्दतीने चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास जेलरोडवरील एक सराफी दुकानही फोडल्याचे उघडकीस आले आहे. सुदैवाने दोन्ही दुकानातून काहीही चोरी झाले नाही.

गुरूवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी टाकळीरोडवरील मोहिनीराज ज्वेलर्सच्या दुकानापुढे एक कार उभी करत ज्वेलर्सच्या दुकानाचे ग्रील कापून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी दुकानातील लॉकरदेखील फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र लॉकर फोडणे त्यांना शक्य झाले नाही. दिवस उगविल्यामुळे रस्त्यांवर नागरिकांची ये-जा सुरू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ दुकानातून बाहेर येत कारमधून पोबारा केला. सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी मालक नेहमीप्रमाणे आले असता त्यांना ग्रील तुटलेले दिसल्याने दुकानफोडी झाल्याचा संशय आला. तत्काळ त्यांनी भद्रकाली पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे हे पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले. तत्काळ पंचनामा करत सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन त्याअधारे चोरट्यांचा शोध सुरू केला. या दुकानफोडीच्या प्रयत्नात सुदैवाने दागिणे, रक्कम सुरक्षित राहिली. याप्रकरणी दुकानमालक सचिन वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.ग्रील कापले, सीसीटीव्ही फोडलेजेलरोड येथील त्रिवेणी पार्कमध्ये हर्षल प्रकाश बाबर यांच्या मालकीचे तेजस्वी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. बाबर यांना सकाळी त्यांच्या शेजारच्या दुकानमालकाने त्यांना फोनवरून दुकानाच्या ग्रीलच्या लोखंडी पट्ट्या कापलेल्या दिसून आल्या. तसेच दोन सीसीटीव्ही कॅमेरेही तुटलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चोरटे अल्टो कारमधून आले. त्यांनी ग्रीलचे कुलुप तोडून आतमध्ये प्रवेश केला; मात्र शटर उचकटले नसल्याने व जॉगर्सदेखील ये-जा करु लागल्याने तेथून चोरट्यांनी पळ काढला. बाबर यांच्या फिर्यादीवरुन चोरट्यांविरुध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरी