‘मेरी’चे कार्यालय चोरट्यांनी फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:42 PM2019-12-10T23:42:36+5:302019-12-11T00:23:34+5:30

पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील महाराष्टÑ अभियांत्रिकी संशोधन केंद्रात (मेरी) अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि.७) निर्मिती कक्षाच्या अंतर्गत असलेल्या कार्यालय व भांडार कक्षाचे पत्रे उचकटून प्रवेश करत अ‍ॅल्युमिनियम, तांब्याचे सुमारे ११० किलो भंगारासह वेल्ंिडग यंत्र, उपकरणे असा एकूण ३८ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी (दि.१०) उघडकीस आली.

 Thieves break into Mary's office | ‘मेरी’चे कार्यालय चोरट्यांनी फोडले

‘मेरी’चे कार्यालय चोरट्यांनी फोडले

Next

नाशिक : पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील महाराष्टÑ अभियांत्रिकी संशोधन केंद्रात (मेरी) अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि.७) निर्मिती कक्षाच्या अंतर्गत असलेल्या कार्यालय व भांडार कक्षाचे पत्रे उचकटून प्रवेश करत अ‍ॅल्युमिनियम, तांब्याचे सुमारे ११० किलो भंगारासह वेल्ंिडग यंत्र, उपकरणे असा एकूण ३८ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी (दि.१०) उघडकीस आली.
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरकारी मालमत्ता, आस्थापनांना अज्ञात भुरट्या चोरांच्या टोळीने लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. चोरट्यांनी शनिवारीच अहिल्यादेवी होळकर पुलाच्या लागून ‘वॉटर कर्टन’चे (इंद्रधनुष्य कारंजा) १५ एलइडी दिवे व ४० मीटरची केबल गायब केल्याची घटना घडली. पंचवटी भागातील सरकारी आस्थापनांसह मालमत्ता असुरक्षित झाल्याचे बोलले जात आहे. परिसरात घरफोड्या, जबरी चोऱ्या घडत असल्याने पोलिसांची दिवस-रात्रीची गस्त थंडावल्याचे स्पष्ट होते. मेरीच्या आवारातील कार्यालय व भांडारगृहातून चोरट्यांनी १ सिंगल फेज वेल्डिंग यंत्र, बाष्पीभवन मापक उपकरणाचे २६ नग, १०५ किलो तांब्याचे भंगार, ९ किलोचे अ‍ॅल्युमिनियम भंगार असा एकूण सुमारे ३८ हजार ८०० रुपयांचा ऐवज लांबविल्याची फिर्याद वैभव प्रतापराव पाटील यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली आहे.

Web Title:  Thieves break into Mary's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.