नाशिककरांच्या पाच दुचाकींवर चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 15:46 IST2021-07-04T15:45:57+5:302021-07-04T15:46:12+5:30
पाथर्डी फाटा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयाशेजारी असलेल्या अनधिकृत पार्किंगमधून एक दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिककरांच्या पाच दुचाकींवर चोरट्यांचा डल्ला
नाशिक : शहरात वाहन चोरीचे सत्र सुरु असून चोरट्यांनी विविध ठिकाणांवरुन चार दुचाकी लंपास केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या सर्व वाहन चोर्या जून महिन्यातील आहेत. याप्रकरणी पंचवटी, गंगापुररोड, सातपुर, अंबड पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे.
हनुमानवाडी येथील ओंकार हाईटस या इमारतीच्या पर्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरल्याचा प्रकार २६ जुनला घडला. येथील राम बाबुराव सानप यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांची दुचाकी (एमएच १५ बीएच ९१३६) ही दुचाकी इमारतीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
गंगापुर रोडच्या पंपींग स्टेशन परिसरातील चिंतामणी अपार्टमेंट येथील इमारतीच्या पार्किंमध्ये पार्क केलेली प्रल्हाद खंडेराव जाधव यांची (एमएच १५ बीवाय ८९११) ही हिरो होंडा स्पलेंडर दुचाकी २६ जुनला चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी गंगापुर रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिसरी घटना सातपुर औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या गेटसमोरील पार्किंमध्ये घडली. येथे पार्क केलेली महेश पितांबर ठोंबरे (रा. अक्षरधाम रो हाऊस, पंचवटी अग्रा रोड) यांची (एमएच १५एचके ५९३५) ही दुचाकी २२ जुनला चोरट्यांनी लंपास केली.
पाथर्डीफाटा येथे उड्डाणपुलाखाली पार्क केलेली येथील वेदांतनगरमध्ये राहणारे प्रविण भिकाजी पगार यांची (एमएच १५एचडी ९१६१) दुचाकी चोरट्यांनी लंपास केली.
पाथर्डी फाटा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयाशेजारी असलेल्या अनधिकृत पार्किंगमधून एक दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण भिकाजी पवार ( २५ रा. कडवेनगर, पाथर्डी फाटा) यांनी त्यांची यामाहा मोटारसायकल (एम एच१५ एचडी ९१६१) पाथर्डी फाटा येथे वाहतूक शाखा कार्यालयाच्या शेजारील अनधिकृत पार्किंगमध्ये लावून ते कामावर गेले होते.