बंगल्यात शिरून चोरट्याने साडेसात लाखांचे दागिने चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 01:30 IST2021-12-06T01:30:29+5:302021-12-06T01:30:51+5:30

बंगल्याचे दार उघडे असल्याचे संधी साधून चोरट्यांनी बंगल्यात शिरून चांगलाच डल्ला मारला. बंगल्यात सर्व कुटुंबीय असताना देखील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह तब्बल साडे सात रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना सातपूरला घडली आहे.

The thief broke into the bungalow and stole jewelery worth Rs 7.5 lakh | बंगल्यात शिरून चोरट्याने साडेसात लाखांचे दागिने चोरले

बंगल्यात शिरून चोरट्याने साडेसात लाखांचे दागिने चोरले

सातपूर : बंगल्याचे दार उघडे असल्याचे संधी साधून चोरट्यांनी बंगल्यात शिरून चांगलाच डल्ला मारला. बंगल्यात सर्व कुटुंबीय असताना देखील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह तब्बल साडे सात रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना सातपूरला घडली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील सूर्यदर्शन कॉलनीतील मधुकर रामकृष्ण सांगळे यांचा गोदावरी बांगला आहे. शुक्रवारी (दि.३) सांगळे कुटुंबीय घरीच होते. रात्री बंगल्याचा दरवाजा उघडा राहिल्याने ही संधी साधून चोरट्यांनी बंगल्यात शिरुन दोन्ही बेडरूममधील लाकडी व लोखंडी कपाटात ठेवलेली सुमारे ४८ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे ७ लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला.

 

उघड्या बंगल्यात शिरुन चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याचा प्रकार पहाटे उघडकीस आला आहे. याबाबत सांगळे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला असून लवकरच ते हाती लागतील, असा विश्वास व्यक्त केला आला. सहायक निरीक्षक पठाण पुढील तपड करीत आहेत.

Web Title: The thief broke into the bungalow and stole jewelery worth Rs 7.5 lakh