शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

पाच हजार लोकांचे थर्मल स्कॅनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 1:31 AM

शहरातील कोरोनाला आळा घालण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने आणखी एक पाऊल पुढे टाकत गर्दीच्या ठिकाणी आधुनिक अशा स्मार्ट हेल्मेटद्वारे नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग केले जात आहे. या हेल्मेटच्या माध्यमातून एका मिनिटात २०० तर तासाभरात १२ हजारांपेक्षा अधिक नागरिकांची स्कॅनिंग होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे गर्दीच्या ठिकाणी कोरोना संशयित रु ग्णाला शोधून कोरोना संसर्गाच्या फैलावाला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास भारतीय जैन संघटनेने व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देगर्दीत उपयुक्त । कोरोना रुग्णांच्या शोधासाठी जैन संघटनेचे स्मार्ट हेल्मेट

नाशिक : शहरातील कोरोनाला आळा घालण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने आणखी एक पाऊल पुढे टाकत गर्दीच्या ठिकाणी आधुनिक अशा स्मार्ट हेल्मेटद्वारे नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग केले जात आहे. या हेल्मेटच्या माध्यमातून एका मिनिटात २०० तर तासाभरात १२ हजारांपेक्षा अधिक नागरिकांची स्कॅनिंग होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे गर्दीच्या ठिकाणी कोरोना संशयित रु ग्णाला शोधून कोरोना संसर्गाच्या फैलावाला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास भारतीय जैन संघटनेने व्यक्त केला आहे.मागील महिनाभरापासून भारतीय जैन संघटना, महापालिका तसेच विविध सामाजिक संघटनेच्या वतीने ‘मिशन झिरो नाशिक’ अभियान संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात राबविले जात आहे. दरम्यान, या हेल्मेटमुळे दिवसभरात सुमारे एक लाखापेक्षा अधिक नागरिकांचे स्कॅनिंग करणे शक्य होणार असल्याचे संघटनेचे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला यांनी सांगितले.तीन तासात५ हजार २०० लोकांचे स्कॅनस्मार्ट हेल्मेटद्वारे पहिल्याच दिवशी केवळ तीन तासात शहरातील गर्दीच्या मुख्य ठिकाणांवर जाऊन ५ हजार २०० लोकांचे स्कॅनिंग करण्यात आले. त्यापैकी एकूण ५७ तापाचे रुग्ण हुडकून काढण्यात आले. या रुग्णांचा ताप सुमारे १००पेक्षा अधिक होता तरीदेखील ते सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी वावरताना आढळले. या सर्वांची तत्काळ ‘रॅपिड अ‍ॅँॅॅटिजेन कोविड चाचणी’ करण्यात आली. त्यापैकी १५ तापाच्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दुपारी तासभर जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे स्मार्ट हेल्मेटद्वारे केली जाणारी थर्मल स्कॅनिंग मोहीम थांबविण्यात आली.आतापर्यंत ५५ हजारअ‍ॅँटिजेन चाचण्यामिशन झिरो नाशिक अभियानांतर्गत गेल्या चाळीस दिवसांत ५५ हजार ३५२ लोकांच्या रॅपिड अ‍ॅँटिजेन कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ८ हजार ६३७ लोक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार पुढील उपचारासाठी क्वॉरण्टाइन सेंटरला पाठविण्यात आले.....असा घेतला जातो शोध२० लाखांच्या या स्मार्ट हेल्मेटच्या मध्यभागी कॅमेरा तसेच सेन्सर बसविण्यात आले आहे. कॅमेरा११ फुटावरूनही व्यक्तीच्या शरीराचे तापमान सहज मोजतो. क्यूआर कोड, मोबाइल अ‍ॅप्लिकेशनद्वारे स्मार्ट हेल्मेट जोडलेले असते. या आधुनिक हेल्मेटमुळे एका मिनिटात साधारणत: दोनशे, तर तासभरात बारा हजार आणि दिवसभरात सुमारे एक लाख नागरिकांचे सहज स्कॅनिंग करता येऊ शकते. ज्या नागरिकांचे शरीराचे तपमान जास्त आढळून येईल त्याचे आॅक्सिमीटरने आॅक्सिजन तपासणी तसेच लक्षणे आढळून आल्यास अ‍ॅँटिजेन रॅपिड कोरोना टेस्ट केली जाणार आहे.स्मार्ट हेल्मेटद्वारे नागरिकांची थर्मल तपासणीची सुरुवात शनिवारी(दि. ५) कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. या स्मार्ट हेल्मेटच्या माध्यमातून संघटनेच्या स्वयंसेवकांनी पीपीई सूट घालून बाजार समितीच्या आवारात फेरफटका मारत तेथील विक्रेते, ग्राहकांना स्कॅन केले. प्रत्येकाच्या शरीराच्या तापमानाची नोेंद करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती