कर्जफेडीसाठी स्थानिक भाषेत व्हावी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:48+5:302021-06-16T04:20:48+5:30

नाशिक : पीक कर्ज वाटप करताना असलेल्या लक्ष्यांकानुसार सूक्ष्म नियोजन करण्याबरोबरच कर्जफेड करण्याबाबत असणाऱ्या नियमांची स्थानिक भाषेत जनजागृती करण्याचे ...

There should be public awareness in local language for debt repayment | कर्जफेडीसाठी स्थानिक भाषेत व्हावी जनजागृती

कर्जफेडीसाठी स्थानिक भाषेत व्हावी जनजागृती

Next

नाशिक : पीक कर्ज वाटप करताना असलेल्या लक्ष्यांकानुसार सूक्ष्म नियोजन करण्याबरोबरच कर्जफेड करण्याबाबत असणाऱ्या नियमांची स्थानिक भाषेत जनजागृती करण्याचे आदेश विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात पीक कर्ज वाटपाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेंद्रु शेखर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक मोहमद आरीफ यांच्यासह सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे समन्वयक उपस्थित होते.

सन २०२०-२१ हंगामाकरिता पीक कर्ज वाटपाचा आराखडा तसेच आदिवासी भागातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठीची सुलभता आणण्यासाठी स्थानिक भाषेतून त्यांच्यापर्यंत पोहचले तर उद्देश सफल होऊ शकेल, असे यावेळी झिरवाळ यांनी सांगितले. जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना बँकांना केल्या तसेच त्यांचे काय नियोजन आहे याची माहिती जाणून घेतली. आदिवासी भागात काम करताना सर्व बँकांनी संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही हातभार लावला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, पीक कर्ज योजनेंतर्गत येणारा निधी बँकांनी वसुलीपोटी जमा करू नये, अशा सूचनाही झिरवाळ यांनी केल्या आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँक व इतर राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज वाटप करावे, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, कर्ज वाटप करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बॅंकांनी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लक्ष्यांकानुसार जास्तीत जास्त पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, या सर्व बँकांनी कर्ज पुरवठा करताना आणि कर्जाची वसुली करताना नियोजन करून आराखडा तयार करावा, कर्जफेड करण्याबाबत असणाऱ्या नियमांची स्थानिक भाषेत जनजागृती केल्यास त्याचा अधिक सकारात्मक परिणाम दिसून येईल, असेही झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

--कोट--

पीक कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्जाची थोडीफार थकबाकी रक्कम जमा केली तर ते शेतकरी नवीन कर्ज मिळविण्यास पात्र ठरतील. जे शेतकरी ३० जूनपर्यंत नियमित कर्जाची परतफेड करतील त्यांना शून्य टक्के व्याजदराने नवीन कर्ज उपलब्ध होणार आहे.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

===Photopath===

140621\14nsk_41_14062021_13.jpg

===Caption===

पीक आढावा बैठकीप्रसंगी मार्गदर्शन करतांना नरहरी झिरवाळ. समवेत आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे,  सतीश खरे, भागवत डोईफोडे,अर्धेंद्रु शेखर आदि.

Web Title: There should be public awareness in local language for debt repayment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.