शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
3
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
4
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
5
मुलाखतीदरम्यान 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर चिडले, काम सोडतो म्हणाले; नेमकं काय घडलं?
6
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
7
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
8
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; SBI चमकला, पॉवरग्रिडमध्ये मोठी घसरण
10
मतदान केलं नाही म्हणून पक्षाने पाठवली नोटीस; BJP खासदार म्हणाले, "सभेला बोलवलं नाही तर मी..."
11
असं काय झालं की RBIनं सरकारला दिले ₹२.११ लाख कोटी, इमर्जन्सी रिस्क बफर का वाढवला?
12
किर्तीकर - मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून वाद मिटवावा; दरेकर, शिशिर शिंदेंच्या आरोपानंतर केसरकरांचा सल्ला
13
बिघाड असलेली पोर्शे वडिलानेच दिली आपल्या लेकाच्या ताब्यात; विशाल अग्रवालसह तिघांची पोलिस कोठडीत रवानगी
14
मुकेश अंबानींच्या ₹१५००० कोटींच्या अँटिलियापेक्षाही मोठ्या घरात राहतात राधिकाराजे गायकवाड; माहितीये कोण आहेत त्या?
15
पुण्यातील पोर्शेच्या घटनेनंतर यूपी पोलीस ॲक्शनमोडवर; २ मुलांच्या मृत्यू प्रकरणी एकाला ६ महिन्यांनंतर अटक
16
कशी आहे शाहरुखची प्रकृती? जुही चावलाने दिले हेल्थ अपडेट; म्हणाली, 'देवाच्या मनात असेल तर...'
17
सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
18
आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस
19
मुंबईपेक्षा दिल्लीतील राहणीमान अधिक चांगले; ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या निर्देशांकात भारतीय शहरे माघारली
20
चोरी गेलेले, हरवलेले हजारो मोबाइल दिले परत; सीईआयआर पोर्टलच्या मदतीने केला तपास

नाशिक शहरात पाणी कपात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:09 PM

नाशिक-  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदाच्या वर्षी पाणी कपात केली जाणार नाही अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली. अर्थात, धरणात मुबलक साठा असला तरी नागरीकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन त्यांनी केले.

ठळक मुद्देमहापौर सतीश कुलकर्णी यांची माहिती गंगापूर धरणाची केली पाहणी

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदाच्या वर्षी पाणी कपात केली जाणार नाही अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली. अर्थात, धरणात मुबलक साठा असला तरी नागरीकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन त्यांनी केले.

मे महिना सुरूअसल्याने जिल्ह्यातील जलशयातील साठा कमी झाला आहे. त्यातच दारणा धरणात महापालिकेला ४०० दश लक्ष घन फुट आरक्षण मिळाले असले तरी वालदेवी नदीत मलयुक्त पाणी येत असल्याने हे पाणी वापरता येऊ शकत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे नाशिकरोड विभागासाठी गंगापूर धरणातूनच पाणी दिले जात असल्याने अखेरच्या टप्प्यात काही प्रमाणात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने प्रशासनाने कपातीचा प्रस्ताव सादर केला होता. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत तोे फेटाळण्यात आला असला तरी महापौर सतीश कुलकर्णी यांनी शनिवारी (दि. २२) धरण साठ्याची पहाणी केली. 

 महानगरपालिकेच्या वतीने गंगापूर,गौतमी व कश्यपी या समूह धरणांमधून शहरात पाणीपुरवठा केला जात असतो सध्याची गंगापूर धरणातील पाण्याच्या साठ्याची माहिती घेऊन पाणी कपातीबाबतच्या निर्णया घेण्यात येणार होता. त्यामुळे गंगापूर धरणातील पाण्याच्या साठ्याची पाहणी महापौर सतीश कुलकर्णी तसेच सभागृह नेते सतीश सोनवणे,अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता शिवाजी  चव्हाणके,  अविनाश धनाईत,पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुभाष मिसाळ यांनी केली. 

सध्याचा उपलब्ध पाणीसाठा व असणारी आवश्यकता याची सविस्तर माहिती यावेळी घेण्यात आली धरणात सध्याच्या परिस्थितीत ४७ टक्के इतका पाणी साठा असून तो साठा पुरेसा असल्याने नाशिक शहरात सध्याच्या परिस्थितीला पाणी कपात केली जाणार नाही. मात्र शहरवासीयांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater shortageपाणीकपातsatish kulkarniसतीश कुलकर्णीBJPभाजपा