Join us  

कशी आहे शाहरुखची प्रकृती? जुही चावलाने दिले हेल्थ अपडेट; म्हणाली, 'देवाच्या मनात असेल तर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 8:47 AM

Shahrukh khan health update: शाहरुखला अचानक त्रास झाल्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan)सध्या अहमदाबाद येथील KD रुग्णालयात अॅडमीट आहे. शाहरुख आयपीएल (IPL) मॅचसाठी अहमदाबादला गेला होता. मात्र, उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे त्याला डिहायड्रेशन झालं आणि परिणामी त्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. किंग खानची प्रकृती बिघडल्यामुळे त्याचे चाहते चिंतेत पडले असून अभिनेत्री जुही चावलाने शाहरुखच्या प्रकृतीचे अपडेट नुकतेच दिले आहेत.

जुही चावलाने 'नेटवर्क 18' सोबत बोलतांना शाहरुखच्या प्रकृतीचे अपडेट दिले आहेत. तसंच त्याला डिस्चार्ज नेमका कधी मिळू शकेल हेदेखील तिने सांगितलं आहे.

जुहीने दिले शाहरुखचे हेल्थ अपडेट

काल (२१ मे) रात्रीपासून शाहरुखला अस्वस्थ वाटत होतं. परंतु, सध्या त्याची योग्य पद्धतीने काळजी घेतली जात आहे. आज संध्याकाळपासून (२२ मे) त्याच्या प्रकृतीत जरा सुधारणा जाणवत आहे. जर देवाच्या मनात असेल तर लवकरच तो बरा होईल. आणि, विकेंडच्या दिवशी स्टँड्समध्ये उभा राहून फायनलमध्ये पोहोचलेल्या टीमला चिअर करतांना दिसेल, असं जुही म्हणाली.

शाहरुखसोबत गौरीदेखील रुग्णालयात

ANI ने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गौरी खान शाहरुखसोबत रुग्णालयात त्याची काळजी घेत आहे. 

नेमकं काय झालंय शाहरुखला?

अहमदाबाद येथे KKR च्या मॅचनंतर शाहरुखला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उन्हाचा तडाखा आणि डिहायड्रेशन याच्यामुळे त्याला त्रास झाल्याचं समोर आलं आहे. बुधवारी (२२ मे) दुपारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

टॅग्स :शाहरुख खानजुही चावला बॉलिवूडगौरी खानआयपीएल २०२४