..तर भाजपाला दोनशे जागाही मिळणार नाहीत : राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:50 IST2018-09-04T01:50:35+5:302018-09-04T01:50:55+5:30
देशातील जनतेचा ट्रेंड बदलला आहे, त्याची सुरुवात गुजरात राज्यातील निवडणुकीपासून झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमपीच असलेल्या गुजरातमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपाला ९९ जागांवरच समाधान मानावे लागले, तर कॉँग्रेस कुठून कोठपर्यंत पोहोचून गेली.

..तर भाजपाला दोनशे जागाही मिळणार नाहीत : राज ठाकरे
नाशिक : देशातील जनतेचा ट्रेंड बदलला आहे, त्याची सुरुवात गुजरात राज्यातील निवडणुकीपासून झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमपीच असलेल्या गुजरातमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपाला ९९ जागांवरच समाधान मानावे लागले, तर कॉँग्रेस कुठून कोठपर्यंत पोहोचून गेली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा विचार केला तर भाजपाला गुजरातमध्ये १६५ जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु नरेंद्र मोदींसह अख्खा भाजपा या निवडणुकीत विजयासाठी लढूनही त्यांचा तसा पराभवच झाला, दुसरीकडे एकटे राहुल गांधी कॉँग्रेससाठी लढत होते. या सर्व गोष्टींचा विचार करता, आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर भाजपाच्या ७० ते ८० जागा कमी होतील. येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला २०० जागाही मिळणार नाही असे भाकीत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
धुळ्याहून नाशिकमार्गे मुंबईकडे परतणाºया ठाकरे यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला, ते पुढे म्हणाले, देशासमोर भाजपाशिवाय पर्याय नाही, असा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे असते तर इंद्रकुमार गुजराल, देवेगौडा, चंद्रशेखर हे पंतप्रधान कधी झाले असते काय? महात्मा गांधी यांनी नेहरूंचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केले म्हणून ते झाले, त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी पंतप्रधान झाले, तेव्हा कोणीच आजन्म कोणत्याच पदासाठी कायम नसतो. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपोआपच पंतप्रधानपदाचा उमेदवार समोर येतो. आपल्या लोकशाहीत अगोदर खासदार निवडून यावा लागतो व नंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरतो हे लक्षात घेतले पाहिजे. असे सांगून राज ठाकरे यांनी दुसरे महायुद्ध जिंकून आलेल्या विल्यम चर्चिलचे उदाहरण दिले. युद्धानंतर झालेल्या निवडणुकीत चर्चिलचा तेथील जनतेने पराभव केला, कारण चर्चिल युद्ध जिंकण्यासाठी योग्य होता, देश चालविण्यासाठी नव्हे, त्यामुळे जनता नुसतीच सुशिक्षित असून, चालत नाही, ती सुज्ञ असणेही गरजेचे असल्याचे सांगितले.
* कालिदासच्या भाडेवाढीत लक्ष घालणार
या चर्चेत राज ठाकरे यांनी कालिदास कलामंदिराच्या भाडेवाढीची माहिती जाणून घेतली व लगेचच मुंबईला संपर्क करून तेथील नाट्यगृहांचे किती भाडे आहे याची माहिती घेतली. मुंबईत शनिवार, रविवारी १५ ते २० हजार रुपये भाडे आहे, त्या मानाने नाशिकला दुप्पट भाडे असल्याचे ते म्हणाले. स्थानिक संस्थांची आर्थिक क्षमता असल्यामुळेच वास्तू उभारल्या जात असल्या तरी, त्याचा वापर सामान्यांना सुलभपणे करता यावा, असा हेतू असणे आवश्यक आहे. पैसे कमाविणे हा उद्देश असेल तर त्या वास्तुंचा काय उपयोग? असा सवालही त्यांनी केला. कालिदासच्या भाडेवाढीत आपण लक्ष घालू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
* महाराष्टतील रस्त्यांची वाट लागली
औरंगाबादहून धुळ्याला व तेथून नाशिकला येताना रस्त्यांची अक्षरश: वाट लागल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. महाराष्टÑ पुन्हा एकदा खड्ड्यात गेल्याचे सांगून, नाशिक दौºयावर येत असताना शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्या वाहनांचे खड्ड्यामुळे टायर फुटल्याची माहिती ठाकरे यांनी जाणून घेतली. सरकारच्या कामाचे मूल्यमापन जनताच करेल, असे ते म्हणाले.
काम केल्याने मते मिळतात हा भ्रम
कामे केल्याने मते मिळतात हा भ्रम असल्याचे सांगून ठाकरे यांनी अप्रत्यक्ष नाशिककरांवरची नाराजी प्रकट केली. नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना खूप कामे करण्यात आली, अजित पवार यांच्या ताब्यात पिंपरी-चिंचवड महापालिका असताना खूप मोठी कामे झाली, परंतु निवडणुकीत लोकांनी सत्ता दुस-यांच्या ताब्यात दिली हे पाहिल्यावर लोकांना कामे न करणारा राजकीय पक्ष हवा असतो यावर माझा ठाम विश्वास बसल्याचे ते म्हणाले.
तुकाराम मुंढे यांच्यावर टीका
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आजवर काय कामे केली ती मी पाहिलेली नाही किंवा त्यांच्याशी कधी संबंध आला नाही, परंतु एकूणच होणाºया तक्रारी पाहता मुंढे हे उर्मट अधिकारी असल्याचे जाणवते. प्रशासनाने प्रशासकीय कामे करावीत, परंतु लोकप्रतिनिधींचा मानसन्मानही राखला जावा, सारेच जर आयुक्त करणार असतील तर निवडणुका तरी कशाला घ्यायच्या? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. आमची सत्ता असताना अधिकाºयांना राज्य सरकार कामे करू देत नव्हते, आता त्यांची सत्ता आल्यावर अधिकारी कामे कशी काय करू लागले, अशी विचारणाही त्यांनी केली.