शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांच्या’ अंगणात उजळल्या ‘हंडाभर चांदण्या’

By admin | Updated: August 18, 2016 01:22 IST

जलाभियान : आदिवासी भागातील तीन गावे पाणीटंचाईमुक्त

जलाभियान : आदिवासी भागातील तीन गावे पाणीटंचाईमुक्तनाशिक : आदिवासी भागातील शेवखंडी, फणसपाडा आणि खोटरेपाडा ही अतिदुर्गम गावे. अनेक किलोमीटर पायपीट केल्यानंतर तेथील माउलींच्या हंड्यात पाणी जमा व्हायचे, परंतु एक दिवस त्यांच्या अंगणातच पाणी येऊन पोहोचले तेव्हा त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव तरळले. पाणीटंचाईने होरपळून निघालेल्या गावाचीच व्यथा मांडणाऱ्या ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकाच्या प्रयोगांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या निधीतून सोशल नेटवर्किंग फोरमने हे जलाभियान हाती घेतले आणि तीनही गावे शंभर टक्के पाणीटंचाईमुक्त करत एक आदर्श समाजापुढे ठेवला. नाशिकचे नाट्यलेखक दत्ता पाटील यांच्या प्रतिभाशाली लेखणीतून आणि सचिन शिंदे यांच्या कल्पक दिग्दर्शनातून ‘हंडाभर चांदण्या’ हे दोन अंकी नाटक उभे राहिले. वर्षानुवर्षे पाण्याची वाट पाहत अगतिक झालेल्या गावाच्या विदारक परिस्थितीवर बेतलेले हे नाटक भीषण दुष्काळाची दाहकताही अधोरेखित करते. गेल्या काही महिन्यांत पाणीटंचाईने अवघा महाराष्ट्र अस्वस्थ बनलेला असताना नेमक्या काळात ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकाची संहिता समोर आली आणि सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून निरनिराळे सामाजिक अभियान राबविणारे प्रमोद गायकवाड यांनी सदरचा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी निर्माता म्हणून भूमिका निभावली. राज्यस्तरीय व्यावसायिक नाट्य निर्माता संघाच्या वतीने आयोजित स्पर्धेत नाटकाने विक्रमी पारितोषिके पटकावली आणि राज्यात प्रथम क्रमांक पटकावला त्याचवेळी नाटकावर पसंतीची मोहोर उमटली गेली. त्यामुळे निर्मात्यासह लेखक व दिग्दर्शकाचा उत्साह दुणावला आणि सदर नाटकाचा विषय पाहता ‘हंडाभर चांदण्या’चे प्रयोग महाराष्ट्रभर करत दुष्काळग्रस्त गावांसाठी प्रत्यक्ष मदतनिधी उभारता येईल काय, असा विचार पुढे आला. ग्रामीण आणि आदिवासी भागांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमाच्या जलाभियानासाठी नाटकाचे प्रयोग लावण्यात आले.