कंपनीतील  तीन लाखांच्या स्पेअर पार्टची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:11 IST2018-10-25T01:11:24+5:302018-10-25T01:11:49+5:30

सुरक्षारक्षक, कंत्राटी कर्मचारी व स्क्रॅप ठेकेदार यांनी संगनमत करून कंपनीतील तीन लाख रुपयांचे स्पेअर पार्ट चोरून नेल्याची घटना अंबड औद्योगिक वसाहतीतील गॅब्रियल कंपनीत घडली आहे़ विशेष म्हणजे चोरी केलेले स्पेअर पार्ट कंपनीच्याच ठेकेदारास संशयितांनी विक्री केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़

 Theft of three lakh spare parts of the company | कंपनीतील  तीन लाखांच्या स्पेअर पार्टची चोरी

कंपनीतील  तीन लाखांच्या स्पेअर पार्टची चोरी

नाशिक : सुरक्षारक्षक, कंत्राटी कर्मचारी व स्क्रॅप ठेकेदार यांनी संगनमत करून कंपनीतील तीन लाख रुपयांचे स्पेअर पार्ट चोरून नेल्याची घटना अंबड औद्योगिक वसाहतीतील गॅब्रियल कंपनीत घडली आहे़ विशेष म्हणजे चोरी केलेले स्पेअर पार्ट कंपनीच्याच ठेकेदारास संशयितांनी विक्री केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़  अंबड औद्योगिक वसाहतीतील गॅब्रियल इंडिया लिमिटेड कंपनीतील सुरक्षारक्षक संशयित बाविस्कर, कंत्राटी कर्मचारी महेंद्र शिवमूर्तीसिंग व स्क्रॅप ठेकेदार मोहम्मद असलम शेख यांनी संगनमत करून कंपनीच्या स्टोअरमधील तीन लाख रुपये किमतीचे आउटर ट्यूब कास्टिंगचे १ हजार २०० नग (६० बॉक्स) चोरी केले़ चोरी केलेला माल मोहम्मद शेख यास विक्री केला़ शहरात यापूर्वी बॉश कंपनीत असा प्रकार घडल्याचे समोर आले होते़ काही भंगार व्यावसायिक कंपनीतील सुरक्षारक्षक, कंत्राटी कर्मचारी यांना हाताशी धरून कंपनीतील महागडे स्पेअर पार्ट चोरी करून विक्री करीत असल्याचे यापूर्वीही अनेकदा समोर आले आहे़ या प्रकरणी गॅब्रियलचे विजय तिवारणे यांच्या फिर्यादीनुसार या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Theft of three lakh spare parts of the company