आर्टिलरी सेंटर परिसरातून चंदनाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 01:10 IST2020-12-19T01:08:57+5:302020-12-19T01:10:16+5:30

आर्टिलरी सेंटरच्या अशोकचक्र गेट परिसरातून पंधरा ते वीस फूट उंचीचे चंदनाचे झाड चोरट्याने बुंध्यापासून तोडून चोरून नेल्याची घटना घडली आहे.

Theft of sandalwood from the Artillery Center premises | आर्टिलरी सेंटर परिसरातून चंदनाची चोरी

आर्टिलरी सेंटर परिसरातून चंदनाची चोरी

नाशिकरोड : आर्टिलरी सेंटरच्या अशोकचक्र गेट परिसरातून पंधरा ते वीस फूट उंचीचे चंदनाचे झाड चोरट्याने बुंध्यापासून तोडून चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आर्टिलरी डेपो रेजिमेंट येथील सुभेदार देशराज यांनी फिर्याद दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आर्टिलरी सेंटर अशोकचक्र गेट बिल्डिंग नंबर १६५ च्या मागे असलेले चार हजार रुपये किमतीचे पंधरा ते वीस फुटाचे चंदनाचे झाड अज्ञात चोरट्याने बुंध्यापासून कापून चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Theft of sandalwood from the Artillery Center premises