झाडांभोवतीच्या संरक्षक जाळ्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 17:44 IST2020-07-14T17:43:24+5:302020-07-14T17:44:10+5:30
सिन्नर: वनविभागाच्या वतीने वृक्ष लागवड अभियान अंतर्गत ओझर ते शिर्डी विमानतळ जोडणाऱ्या राज्य महामार्गावर वावी ते पंचाळे दरम्यान सुमारे पाच हजार झाडे लावण्यात आली आहेत. दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या या झाडांची वनविभागाकडून निगा राखण्या त येत आहे.

झाडांभोवतीच्या संरक्षक जाळ्यांची चोरी
सिन्नर: वनविभागाच्या वतीने वृक्ष लागवड अभियान अंतर्गत ओझर ते शिर्डी विमानतळ जोडणाऱ्या राज्य महामार्गावर वावी ते पंचाळे दरम्यान सुमारे पाच हजार झाडे लावण्यात आली आहेत. दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या या झाडांची वनविभागाकडून निगा राखण्या त येत आहे. झाडांभोवती पावसाळ्यापूर्वी लावण्यात आलेल्या प्लास्टिकच्या संरक्षक जाळ्या चोरीला जाण्याचे प्रकार घडू लागले असून परिसरातीलच काही शेतकरी आपल्या बांधावरील झाडांसाठी या जाळ्यात काढून देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
वनविभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेकडून दोन वर्षांपूर्वीच्या पावसाळ्यात वावी ते पंचाळे दरम्यान वृक्षारोपण करण्यात आले आहे. तर हिवरगाव पर्यंत पुढील टप्प्यात वृक्ष रोपण प्रस्तावित आहेत. रस्तेबांधणी प्रकल्पात झाडे लावून त्याची जोपासना करण्याचे बंधन ठेकेदारांना असले तरी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते. अशा परिस्थितीत वन विभागाने घेतलेला वृक्षलागवडीचा उपक्रम कौतुकास्पद असाच म्हणावा लागेल. सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी सुभाष सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे वृक्षारोपण करण्यात आले आहे. तर वनरक्षक दर्शना सौपुरे यांच्यावर या झाडांची निगा राखणे व संरक्षणाची जबाबदारी आहे. स्थानिक वन मजुरांच्या मदतीने गेली दोन वर्ष या झाडांची सर्व प्रकारे निगा राखली जात आहे. उन्हाळयात टँकरने पाणी घातल्याने हि झाडे बहरली असून त्यामुळे लवकरच वावी ते पंचाळे रस्ता हरित मार्ग म्हणून गणला जाणार आहे. या झाडाच्या संरक्षणासाठी वनविभागाने उन्हाळ्यात प्लास्टिकच्या जाळ्यात लावल्या. सुमारे साडेचार हजार झाडांना हे संरक्षक कुंपण घालण्यात आले आहे. मात्र, या जाळ्या आता चोरट्यांचे लक्ष ठरू लागल्या आहेत. परिसरातील काही शेतकरी या जाळ्या काढून आपल्या शेतात लावलेल्या झाडांसाठी किंवा कोंबड्यांच्या खुराड्या साठी त्यांचा वापर करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वत: पाठलाग करून अशाप्रकारे जाळ्याची चोरी करणाºया शेतकºयांना अनेकदा हटकवले आहे. तरी देखील हे प्रकार सर्रास सुरू असल्याने रस्त्यालगत लागवड केलेल्या झाडांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.