शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

चापडगाव येथे कांदा रोपांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 02:49 IST

ऐन हंगामात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यामुळे कांदा रोपांची चणचण भासत आहे. अशातच सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील शेतकरी प्रभाकर निवृत्ती शेळके यांचे उन्हाळ कांद्याचे दोन किलोचे रोपे बुधवारी (दि.२१) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.

नांदूरशिंगोटे : ऐन हंगामात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यामुळे कांदा रोपांची चणचण भासत आहे. अशातच सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील शेतकरी प्रभाकर निवृत्ती शेळके यांचे उन्हाळ कांद्याचे दोन किलोचे रोपे बुधवारी (दि.२१) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.  तालुक्यातील दापूर-चापडगाव रस्त्यालगत असणाऱ्या शेळके यांच्या शेतात किरण गांगड यांनी कांद्याचे रोप वाट्याने केले आहे. रोपे लागवडीयोग्य झाल्याने पाऊस थांबल्यानंतर वाफे तयार करून लागवड करण्यात येणार होती. परंतु त्याच्या आत चोरट्यांनी सुमारे दोन किलोचे रोप लंपास करून हातसफाई केली. वाटेकरी शेतकरी गांगड गुरुवारी (दि. २२) सकाळी शेतात आल्यानंतर त्यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आला. गांगड यांनी तत्काळ कांदा रोपांची चोरी झाल्याची माहिती शेळके यांना दिली.  रोपांची बाजारात  दहा हजार रुपये किंमत आहे. मजुरी, खत, औषधे तीन हजार रुपये खर्च म्हणजेच एकूण १३ हजारांचे हे रोप होते. ही किंमत काही कमी वाटत असेल तरी सध्या कांद्याच्या बियाणाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने ते महाग झाले आहे. भविष्यात याच रोपापासून शेतकऱ्यांना मोठे आर्थिक उत्पन्न मिळू शकते. दरम्यान, कांदा रोपाचा तुटवडा भासत असल्याने रोपे चोरले असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी