महिलेच्या बॅगेतून नऊ तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 01:25 IST2022-02-24T01:25:05+5:302022-02-24T01:25:28+5:30

अहमदनगर जिल्ह्यातून नाशिकला बसने प्रवास करत असताना, अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या बॅगमधून २ लाख ६० हजार ५०० रुपयांच्या सुमारे नऊ तोळे वजनाच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांसह व रोख तीन हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि.२१) घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Theft of nine weights of jewelery from a woman's bag | महिलेच्या बॅगेतून नऊ तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी

महिलेच्या बॅगेतून नऊ तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी

पंचवटी : अहमदनगर जिल्ह्यातून नाशिकला बसने प्रवास करत असताना, अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या बॅगमधून २ लाख ६० हजार ५०० रुपयांच्या सुमारे नऊ तोळे वजनाच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांसह व रोख तीन हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि.२१) घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिडीकामगार नगरमधील घनश्याम अपार्टमेंट येथील सुवर्णा गुलाब महाजन यांनी तक्रार दाखल केली आहे. सुवर्णा महाजन नाशिकला येण्यासाठी तारापूर बस स्थानकातून बसमध्ये बसल्या होत्या. त्याच वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग उघडून, त्यातून सोन्याचांदीचे दागिने, तसेच रोख रक्कम असा दोन लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. महाजन घरी आल्यानंतर त्यांनी बॅग उघडली असता, त्यातील सोन्या-चांदीचे दागिने चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत, अहमदनगर ते नाशिकच्या दरम्यान बसने प्रवास करताना दागिन्यांची चोरी झाल्याची माहिती पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर करत आहेत.

Web Title: Theft of nine weights of jewelery from a woman's bag