नानेगावला घरातून दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 01:14 IST2022-05-04T01:14:09+5:302022-05-04T01:14:46+5:30

नानेगाव येथील भवानी माता मंदिर परिसरातील एका घरातून सोमवारी (दि. २) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

Theft of jewelery from a house in Nanegaon | नानेगावला घरातून दागिन्यांची चोरी

नानेगावला घरातून दागिन्यांची चोरी

देवळाली कॅम्प : नानेगाव येथील भवानी माता मंदिर परिसरातील एका घरातून सोमवारी (दि. २) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुसया निवृत्ती आडके यांनी चोरीच्या घटनेविषयी फिर्याद दिली आहे. अनुसया आडके यांच्या घरातून सत्तर हजार रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. चोरट्याने आडके यांच्या घराच्या अर्धवट खोललेल्या दरवाजातून आत प्रवेश करीत बेडवरील गादीखाली ठेवलेली सहा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून नेली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: Theft of jewelery from a house in Nanegaon