नैताळे येथील श्री मतोबा महाराजांच्या चांदीच्या मूर्तीसह दानपेटीची चोरी; घटनेच्या निषेधार्थ गाव बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 10:25 IST2025-12-03T10:24:45+5:302025-12-03T10:25:20+5:30
चोरट्यांना शोधून कडक शासन करत नाही तोपर्यत नैताळे गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नैताळे येथील श्री मतोबा महाराजांच्या चांदीच्या मूर्तीसह दानपेटीची चोरी; घटनेच्या निषेधार्थ गाव बंद
शेखर देसाई
लासलगाव (नाशिक) - लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व नैताळे गावाचे आराध्य दैवत श्री मतोबा महाराज यांच्या मंदिरातून चांदीच्या तीन किलो वजनाच्या दोन मुर्तीची व दान पेटीची मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरी झाली असून या घटनेमुळे ग्रामस्थामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जोपर्यंत पोलिस चोरट्यांना शोधून कडक शासन करत नाही तोपर्यत नैताळे गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान निफाड पोलिसानी घटनास्थळी भेट देऊन चोरीची संपुर्ण माहिती घेतली आहे व तपासाची पुढील कार्यवाही सुरु केली आहे. पोलिस निरिक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची पुढील दिशा ठरवली जात आहे. लवकरच श्वान पथकाला पाचारण केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.