ओझर येथे मोटारसायकलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 01:09 IST2019-10-16T01:08:39+5:302019-10-16T01:09:55+5:30
ओझर टाउनशिप येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील जनार्दनस्वामी आश्रमासमोरील बंद टपरीलगत उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.

ओझर येथे मोटारसायकलची चोरी
ओझर टाउनशिप : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील जनार्दनस्वामी आश्रमासमोरील बंद टपरीलगत उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अमित रमेशकुमार शर्मा, रा. पिंपळगाव बसवंत यांनी त्यांची हिरो कंपनीची काळ्या रंगाची पॅशन प्रो दुचाकी ओझरच्या जनार्दनस्वामी आश्रमासमोरील बंद टपरीलगत उभी केली होती. साडेदहा वाजेला परत आल्यानंतर गाडी दिसली नाही. शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने शर्मा यांनी ओझर पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार अंबादास गायकवाड करीत आहेत.