रिक्षा बंद पडल्याचे सांगत वृद्धाच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 15:52 IST2018-10-06T15:50:45+5:302018-10-06T15:52:11+5:30

नाशिक : रिक्षा बंद पडली असून, दुसऱ्या रिक्षाने जाण्याचा वृद्धाला सल्ला देणाºया सुमारे दोघा संशयितांनी ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना द्वारका ते भारतनगर दरम्यान घडली़

Theft of jewelery stolen | रिक्षा बंद पडल्याचे सांगत वृद्धाच्या दागिन्यांची चोरी

रिक्षा बंद पडल्याचे सांगत वृद्धाच्या दागिन्यांची चोरी

ठळक मुद्देद्वारका ते भारतनगर दरम्यान घटना ४८ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज

नाशिक : रिक्षा बंद पडली असून, दुसऱ्या रिक्षाने जाण्याचा वृद्धाला सल्ला देणा-या सुमारे दोघा संशयितांनी ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना द्वारका ते भारतनगर दरम्यान घडली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील कोटमगावरोडवरील देसाई डीम सिटीमध्ये श्याम रमाकांत कल्याणकर (६५) कुटुंबीयांसह राहतात़ गुरुवारी (दि़४) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ते पत्नी व सासूसह द्वारका सर्कलकडून पाथर्डी गावाकडे रिक्षाने जात होते़ भारतनगर चौफुलीजवळ त्यांची रिक्षा बंद पडली असता रिक्षातील ३५ व २२ वयोगटांतील दोघा संशयितांनी रिक्षाबंद पडल्याचे सांगत ‘तुम्ही दुसºया रिक्षाने पाथर्डी गावाकडे जा,’ असा सल्ला दिला़ तसेच या संधीचा फायदा घेत रिक्षातील बॅगेत असलेले पाकीट चोरले़

कल्याणकर यांच्या चोरी गेलेल्या पाकिटात ४० हजार रुपये किमतीची ३७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत होती़ ५००० रुपये किमतीची सोन्याची पोत, दोन हजार रुपये किमतीच सात ग्रॅम वजनाचे कानातले झुमके व वेल तसेच दीड हजार रुपये किमतीचा चांदीचा ग्लास असा ४८ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज होता़

याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Theft of jewelery stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.