‘गन हाऊस’वर डल्ला; २४ एअर पिस्तुलसह रायफल्स् लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 04:28 PM2020-06-25T16:28:48+5:302020-06-25T16:29:25+5:30

गुदामात ठेवलेल्या अग्निशस्त्रांपैकी २४ एअर पिस्तुल, एअर शुटींग रायफल्स, स्टेनगन, छऱ्याचे चार ते पाच खोके आदि असा एकूण सव्वा ते दीड लाख रूपयांचा माल लंपास

Theft on ‘Gun House’; Rifles lamps with 24 air pistols | ‘गन हाऊस’वर डल्ला; २४ एअर पिस्तुलसह रायफल्स् लंपास

‘गन हाऊस’वर डल्ला; २४ एअर पिस्तुलसह रायफल्स् लंपास

googlenewsNext

नाशिक : लॉकडाऊन शिथिल होताच शहरातील आयुक्तालय हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. अज्ञात चोरट्यांनी आडगाव पोलीस ठाणे हद्दीत गन हाऊसचे एक गुदाम फोडून २४ एअर पिस्तुलसह रायफल्स, स्टेनगन यांसारखे अग्निशस्त्र लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नांदूरनाका भागातल निसर्गनगर येथे अथर्व गन हाऊस स्पोर्टसचे दुकान आहे. या दुकानासाठी लागणारा माल ज्या गुदामात ठेवण्यात येतो, त्या गुदामात अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी (दि.२३) रात्री शटर उचकटून प्रवेश केला. गुदामात ठेवलेल्या अग्निशस्त्रांपैकी २४ एअर पिस्तुल, एअर शुटींग रायफल्स, स्टेनगन, छऱ्याचे चार ते पाच खोके आदि असा एकूण सव्वा ते दीड लाख रूपयांचा माल लंपास केल्याचे फिर्यादीत मालक भाऊसाहेब नरहरी बेलेकर यांनी म्हटले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात घरफोड्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक धैर्यशिल घाडगे हे करीत आहेत.

Web Title: Theft on ‘Gun House’; Rifles lamps with 24 air pistols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.