नागापूरला किराणा दुकानात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 17:09 IST2020-09-30T17:08:45+5:302020-09-30T17:09:16+5:30
मनमाड : येथून जवळच असलेल्या नागापूर येथे किराणा दुकानातून किराणा सामान आणि रोख रक्कम असा ४४ हजाराचा ऐवज चोरीस गेल्याची तक्र ार शांताराम निवृत्ती खताळ (४४) रा. नागापूर यांनी मनमाड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

नागापूरला किराणा दुकानात चोरी
मनमाड : येथून जवळच असलेल्या नागापूर येथे किराणा दुकानातून किराणा सामान आणि रोख रक्कम असा ४४ हजाराचा ऐवज चोरीस गेल्याची तक्र ार शांताराम निवृत्ती खताळ (४४) रा. नागापूर यांनी मनमाड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. नागापूर ग्रामपंचायत समोरील बाजूस जय नागेश्वर किराणा दुकान आहे. रात्री ते दुकान बंद करून घरी गेल्यानंतर सकाळी त्यांना दुकानाचे शटरचे कुलूप तुटलेले व शटर वाकलेले दिसून आले. ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता कोणीतरी अज्ञान इसमाने शटरचे कुलूप तोडून शटर वाकवून दुकानातील गल्ल्यात ठेवलेले ४१ हजार रु पये आणि गोवर्धन देशी तुपाच्या बरण्या असा ४४ हजाराचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी मनमाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.