शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

सोनसाखळी चोरीचा सिलसिला सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 7:48 PM

बुधवारी (दि.१२) रात्री ९ वाजेच्या सुमारास अशोकामार्ग-रविशंकरमार्ग टी-पॉइंटच्या कॉर्नरजवळून खुशबू अल्केश बच्छाव (२७, रा. बालाजी हाईट्स) या पायी जात होत्या.

ठळक मुद्दे १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून पळ काढला पोलीस चौकी असूनही सर्रास लूट

नाशिक : मागील काही दिवसांपासून सोनसाखळी चोरांनी आपला मोर्चा अशोकामार्ग, रविशंकरमार्ग या भागांकडे वळविला असून, मंगळवार व बुधवार अशा दोन्ही दिवशी सलग दोन महिलांच्या सोनसाखळ्या अशोकामार्गावरून खेचून चोरट्यांनी मुंबई नाका पोलिसांना जणू खुले आव्हानच दिले आहे. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे रहिवाशांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.गणेशबाबानगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाइकांची विचारपूस करण्यासाठी राहाता येथून श्वेता व्यंकटेश खिस्ते (२९) या मंगळवारी आल्या होत्या. रात्रीच्या सुमारास रुग्णालयाकडे त्या जात असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला हिसका देऊन १० ग्रॅम सोन्याची साखळी घेऊन चोरट्याने पोबारा केला. या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून सुरू केला जात नाही, तोच पुन्हा बुधवारी (दि.१२) रात्री ९ वाजेच्या सुमारास अशोकामार्ग-रविशंकरमार्ग टी-पॉइंटच्या कॉर्नरजवळून खुशबू अल्केश बच्छाव (२७, रा. बालाजी हाईट्स) या पायी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या साधारणत: ३० वर्षे वयोगटातील दोघा चोरट्यांनी बच्छाव यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढला. सुमारे १५ ग्रॅम वजनाचे ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरी झाल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. २१ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अशोकामार्गावरच आदित्यनगरजवळ स्मिता महेश कुलथे या महिलेची १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून पळ काढला होता. या भागातच वीस दिवसांच्या कालावधीत तीन घटना घडल्यामुळे महिलांमध्ये पोलिसांच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.पोलीस चौकी असूनही सर्रास लूटअशोकामार्ग परिसरात दरमहा सोनसाखळी चोरीची एक तरी घटना घडत असल्याने महिलावर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशोकामार्ग चौफुली सिग्नलवर पोलीस चौकी असूनदेखील चोरटे सर्रासपणे या मार्गावर सोनसाखळी चोरी करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांचा धाक या परिसरात चोरट्यांना नसल्याने ही पोलीस चौकी सक्षम करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अनेकदा येथील पोलीस कर्मचारी चौकीच्या बाहेरदेखील पडत नाही. तसेच ज्येष्ठ नागरिक, महिलांनी कायदा सुव्यवस्थेबाबत काही सांगण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना दाददेखील दिली जात नसल्याच्या तक्रारी काही ज्येष्ठ नागरिकांनी केल्या आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरीChain Snatchingसोनसाखळी चोरी