शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

अंबडमध्ये दुकानाचे कुलुप तोडून २१ बोकडांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 15:55 IST

शुक्रवारी (दि.१२) नेहमीप्रमाणे संध्याकाळी दुकान आटोपून बोकडांना आतमध्ये दोरीच्या सहाय्याने बांधून दरवाजाला कुलुप लावून घरी आले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलुप तोडून सुमारे २ लाख रूपये किंमतीचे २१ बोकड चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

नाशिक : शहरातील विविध उपनगरांमधील मटण विक्रेत्यांच्या बोकडांवर 'डल्ला' मारण्याचे सत्र चोरट्यांकडून सुरुच आहे. सातपुर येथील बोकड चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागत नाही, तोच पुन्हा अंबड गावातील एका दुकानाचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी २१ बोकडांची चोरी केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.सातपुर पोलीस ठाणे हद्दीतील कार्बननका भागातील एका खाटिकाचे गुदामाचे कुलुप तोडून मुंब्रा येथील चोरट्यांनी इनोव्हासारख्या आलिशान कारमधून २१ बोकड गायब केले होते. सातपुर गुन्हे शोध पथकाने या गुन्ह्याचा सखोल तपास करत धागेदोरे शोधत मुंब्रा येथून एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून २६ बोकड हस्तगत केले होते. या घटनेचा छडा लागून काही दिवस लोटत नाही, तोच पुन्हा अंबड गावातसुध्दा अशाचप्रकारे २१ बोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जावेद गनी खाटीक (रा. राणेनगर, सिडको) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आव्हान आता अंबड पोलिसांपुढे उभे राहिले आहे.अंबडमध्ये खाटीक यांचे दुकान आहे. ते शुक्रवारी (दि.१२) नेहमीप्रमाणे संध्याकाळी दुकान आटोपून बोकडांना आतमध्ये दोरीच्या सहाय्याने बांधून दरवाजाला कुलुप लावून घरी आले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलुप तोडून सुमारे २ लाख रूपये किंमतीचे २१ बोकड चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरीPoliceपोलिस