कृषी मंत्री कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आणणारं शिक्षा प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात!

By संजय पाठक | Updated: March 18, 2025 16:19 IST2025-03-18T16:17:55+5:302025-03-18T16:19:13+5:30

कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातील सदनिका मिळवण्यासाठी आपल्या नावे नाशिकमध्ये कोणतीही मिळकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र शासनाला सादर केले होते.

The sentencing case that threatens Agriculture Minister Kokate's MLA status is now in the Mumbai High Court | कृषी मंत्री कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आणणारं शिक्षा प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात!

कृषी मंत्री कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आणणारं शिक्षा प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात!

-संजय पाठक, नाशिक 
कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देणाऱ्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल अपिलावर २१ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातील सदनिका मिळवण्यासाठी आपल्या नावे नाशिकमध्ये कोणतीही मिळकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र शासनाला सादर केले होते. मात्र, त्यांनी खोटी माहिती दिल्याची तक्रार माजी मंत्री (कै.) तुकाराम दिघोळे यांनी केली होती. 

कोकाटेंची आमदारकी धोक्यात

त्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याची चौकशी केली आणि त्या आधारे गुन्हा दाखल केला होता. त्याचा निकाल गेल्याच महिन्यात लागला आणि ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे.

कोकाटे यांनी तातडीने जिल्हा सत्र न्यायलयातून शिक्षेला स्थगिती मिळवल्याने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला होता. मात्र, कै. दिघोळे यांच्या कन्या अंजली राठेाड यांनी या शिक्षेला स्थगितीला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात अपिल केले आहे.  

दोन्ही बाजूंकडून कोर्टात युक्तिवाद 

राज्य शासन आणि ॲड. माणिकराव कोकाटे यांना त्यांनी प्रतिवादी केले आहे. त्यावर मंगळवारी (दि.१८) न्यायमूर्ती लढ्ढा यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी प्रतिवादींकडून त्यांचे म्हणणे मागवण्यात आले असून पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी होणार असल्याचे अंजली दिघोळे यांचे वकील ॲड. आशुतोष राठोड यांनी सांगितले.

Web Title: The sentencing case that threatens Agriculture Minister Kokate's MLA status is now in the Mumbai High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.