शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

अजितदादा-भुजबळांमध्ये समेट होणार?; राष्ट्रवादीच्या आमदाराने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 19:12 IST

अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात निर्माण झालेली दरी कमी होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

NCP Hiraman Khoskar ( Marathi News ) : राज्य मंत्रिमंडळातून डावलल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर प्रचंड नाराज झाले असून ते जाहीरपणे अजित पवारांवर टीकास्त्र सोडत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी हा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला असून आम्ही लवकरच छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याचं आमदार हिरामण खोसकर यांनी स्पष्ट केलं आहे.

"मी आणि मंत्री नरहरी झिरवळ हे छगन भुजबळसाहेबांची परवा भेट घेणार आहोत. याबाबत आम्ही अजितदादांशीही चर्चा केली आहे. या दोन नेत्यांनी पुन्हा एकत्र यावं, अशी आमची इच्छा आहे. भुजबळसाहेबांनी राज्यसभेचा विचार करावा आणि त्या माध्यमातून केंद्राचा निधीही नाशिक जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न करावा, अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहोत," अशी माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीतील नेत्यांच्या मध्यस्थीनंतर अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात निर्माण झालेली दरी कमी होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

राष्ट्रवादीत घडलं राजकीय नाट्य

सर्वाधिक ७ आमदार निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने नाशिक जिल्ह्यातील दोन आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली. माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवाळ यांची निवड करताना सामाजिक समीकरणदेखील साधले. पक्षाचे दोन मराठा आमदार निवडून आले असले, तरी कोकाटे हे अनुभवी आणि आक्रमक नेते आहेत. सिन्नरचा त्यांनी केलेला विकास वाखाणण्यासारखा आहे. आदिवासी समाजातून तीन आमदार निवडून आले तरी झिरवाळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष म्हणून गेल्यावेळी चांगली कामगिरी बजावली आहे. आदिवासींच्या प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे सामाजिक समीकरण साधत असतानाच पक्षवाढ, जिल्ह्याचा विकास हे उद्दिष्टट्य समोर ठेवून या दोघांची निवड झाल्याचे दिसते. सर्वसमावेशक वृत्ती हा दोघांमधील समान धागा आहे. कोकाटे यांनी उद्धवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याशी जुळवून घेतले आहे, त्याचप्रमाणे झिरवाळ यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते श्रीराम शेटे यांच्याशी सलोख्याचे संबंध राखले.

मंत्रिमंडळात समावेश होत नसल्याचे लक्षात येताच भुजबळ यांनी विस्तार कार्यक्रम, हिवाळी अधिवेशनाकडे पाठ फिरवत नाशिक गाठले. नाशिक, येवल्यात त्यांनी समर्थकांशी चर्चा केली आणि समता परिषदेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पक्षनेते अजित पवार यांच्यावर त्यांचा सर्वाधिक रोष दिसून आला. त्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुकूल होते, असे म्हणत त्यांच्याशी व पर्यायाने भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काँग्रेसने त्यांना उघड आवतण धाडले. पण कळीचा मुद्दा म्हणजे, भुजबळ आता काय पवित्रा घेणार? ४१ आमदार निवडून आणून अजित पवार यांनी स्वतःचे वर्चस्व आणि अस्तित्व सिद्ध केल्यानंतर आता त्यांना आव्हान देणे भुजबळ यांना कितपत शक्य आहे, हा खरा मुद्दा आहे.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिकAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४