ड्रायव्हरने ओलेक्ट्रा ईलेक्ट्रीक बस सुरु करताच मोठा आवाज झाला, थेट स्थानकात शिरली; महिलेचा मृत्यू

By अझहर शेख | Updated: December 8, 2024 09:34 IST2024-12-08T09:32:18+5:302024-12-08T09:34:16+5:30

Olectra electric bus accident शिर्डी ते नाशिक या मार्गांवर धावणारी ई बस सुरक्षितपणे महामार्ग बस स्थानकात पोहचली.

The Olectra electric bus horrible accident driver roared as it started, straight into the nashik highway station; Death of a woman | ड्रायव्हरने ओलेक्ट्रा ईलेक्ट्रीक बस सुरु करताच मोठा आवाज झाला, थेट स्थानकात शिरली; महिलेचा मृत्यू

ड्रायव्हरने ओलेक्ट्रा ईलेक्ट्रीक बस सुरु करताच मोठा आवाज झाला, थेट स्थानकात शिरली; महिलेचा मृत्यू

नाशिक : शिर्डीहुन नाशिकला महामार्ग बस स्थानकात शनिवारी(दि. ७) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास आलेली ई बस (एम.एच.०४ एलक्यु ९४६२) फलाटावर चौकशीकक्षासमोर थांबली. काही वेळेने बस थेट स्थानकात शिरली यावेळी आंध्रप्रदेशची महिला भाविक बसखाली सापडून जागीच ठार झाली. 

अंजली थट्टीकोंडा - नागार्जुन (२३,रा. पटछवा, जि. प्रकाशम, आंध्रप्रदेश) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

शिर्डी ते नाशिक या मार्गांवर धावणारी ई बस सुरक्षितपणे महामार्ग बस स्थानकात पोहचली. चालक उमेश दत्तात्रय भाबड (३२,रा. वेहळगाव,नांदगाव) यांनी बस थांबाविली.
सर्व प्रवशी खाली उतरल्यानंतर तेदेखील लॉकसीट एंट्री करण्यासाठी खाली उतरले. एन्ट्री करून भाबड पुन्हा बसमध्ये चढले. यावेळी त्यांनी बस सुरू करताच मोठा आवाज झाला अन बसने अचानकपणे उसळी घेत क्षणात लोखंडी बार तोडून थेट चौकशी कक्षाच्या भिंतीवर जाऊन धडकली. कक्षाजवळ ओट्यावरून पती मुपाल्ला नागर्जून(३०, रा. कोंडीकंडुर, जि. प्रकाशम) यांच्यासोबत चालत असलेल्या अंजली यांना बसची जोरदार धडक बसली. यावेळी मुपाल्ला हे थोडक्यात बचावले. त्यांच्या हाताला दुखापत झाली. तसेच चौकशी खिडकीसमोर माहिती घेण्यास उभे असलेले गोरक्ष मछिंद्र गोसावी (५७, रा. पाथर्डीफाटा ) हे देखील बसच्या धडकेत गंभीर जखमी होऊन ओट्यावर कोसळले.

चौकशी कक्षाची एक भिंत पूर्णतः कोसळली. या दुर्घटनेने एकच खळबळ माजली. स्थानकातील कर्मचारी, अन्य बसचे चालक, वाहक यांनी धाव घेत जखमी गोसावी यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अंजली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शासकीय जिल्हा रुग्णालयात त्यांना रुग्णवाहिकेतून हलविण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. गोसावी त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले  घटनेची माहिती मिळत जवळ असलेल्या मुंबई नाका पोलिसांनी महामार्ग बस स्थानकात धाव घेऊन चालक भाबड यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: The Olectra electric bus horrible accident driver roared as it started, straight into the nashik highway station; Death of a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.