मुले गाढ झोपेत असताना आईने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 01:43 IST2022-07-15T01:43:25+5:302022-07-15T01:43:42+5:30

सिडकोमधील उपेंद्रनगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने गुरुवारी (दि. १४) मध्यरात्रीच्या सुमारास मुले गाढ झोपलेली असताना घरातील पंख्याच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

The mother hanged herself while the children were fast asleep | मुले गाढ झोपेत असताना आईने घेतला गळफास

मुले गाढ झोपेत असताना आईने घेतला गळफास

ठळक मुद्देधक्कादायक : सिडकोच्या उपेंद्रनगरमधील घटना

नाशिक : सिडकोमधील उपेंद्रनगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने गुरुवारी (दि. १४) मध्यरात्रीच्या सुमारास मुले गाढ झोपलेली असताना घरातील पंख्याच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

उपेंद्रनगरात राहणाऱ्या उर्मिला आनंद चव्हाण (वय ३२) यांनी त्यांच्या राहत्या घरी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास जीवनप्रवास संपविला. त्यांनी अशाप्रकारे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत पोलिसांकडून त्यांचे पती आनंद चव्हाण यांच्याकडे चौकशी केली जात आहे. चव्हाण दाम्पत्यांमध्ये काही वादविवाद झाले होते का? याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे. घरात पती, मुले हे गाढ झोपलेले असताना उर्मिला यांनी अचानकपणे गळफास लावून घेतला. जेव्हा सकाळी त्यांचे पती झोपेतून जागे झाले, तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेच्या मृतदेहाचा पंचनामा करीत मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. उर्मिला यांच्या आत्महत्येमागील कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकलेले नव्हते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक तपास अंबड पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title: The mother hanged herself while the children were fast asleep