जमिनीच्या हिस्स्यावरून मुलाने पेटवला चारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 00:30 IST2022-02-05T00:30:14+5:302022-02-05T00:30:14+5:30

सटाणा : वाटा हिस्सा देत नाही म्हणून मुलाने व पुतण्याने शेतातील तीन ट्रॉली मक्याच्या चाऱ्याला आग लावून दिल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील नळकस येथे घडली.

The boy lit fodder from a piece of land | जमिनीच्या हिस्स्यावरून मुलाने पेटवला चारा

जमिनीच्या हिस्स्यावरून मुलाने पेटवला चारा

ठळक मुद्दे जायखेडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सटाणा : वाटा हिस्सा देत नाही म्हणून मुलाने व पुतण्याने शेतातील तीन ट्रॉली मक्याच्या चाऱ्याला आग लावून दिल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील नळकस येथे घडली.

नळकस येथील सारदे रस्त्यावरील सजन नारायण देवरे (६५) यांच्या शेतात तीन ट्रॉली मक्याचा कडबा रचलेला होता .बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास देवरे यांचा मुलगा समाधान सजन देवरे व पुतण्या काकाजी उखा देवरे यांनी वडील जमिनीचा वाटा हिस्सा देत नाही म्हणून मोटारसायकलवर येऊन चाऱ्याला आग लावून दिली .या आगीत संपूर्ण चारा जळून झाला .याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The boy lit fodder from a piece of land