अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा थाळीनाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:34 IST2018-09-12T00:33:43+5:302018-09-12T00:34:07+5:30
येवला तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा थाळीनाद
येवला : तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी कर्मचारऱ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. प्रकल्प अधिकाºयांना यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शहरातील हुतात्मा स्मारकापासून अंगणवाडी कर्मचारी महिलांनी हातात फलक घेऊन घोषणा देत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गणेशोत्सवापूर्वी आॅगस्ट महिन्याचे मानधन देण्यात यावे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बजेट वाढवावे, २५ पेक्षा कमी मुले असतील तर ते अंगणवाडी केंद्र बंद करून शेजारच्या अंगणवाडी केंद्रात समाविष्ट करण्यासाठी काढण्यात आलेले आदेश त्वरित रद्द करावे, अंगणवाडी केंद्राच्या लाभार्थींची संख्या ठरवताना एकूण लाभार्थींची संख्या विचारात घेतली पाहिजे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी संघटनेचे भगवान दवणे, जिल्हाध्यक्ष राजश्री पानसरे, राजेश सिंह, तालुकाध्यक्ष कुसुम वाडेकर यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.