शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेत अडकणार ‘ग्रंथयात्रा’

By admin | Updated: September 10, 2016 01:00 IST

महापालिका : ग्रंथयोग काही जुळेना, पदाधिकारी संभ्रमात

नाशिक : दसरा-दिवाळीदरम्यान दि. १४ ते २३ आॅक्टोबर या कालावधीत महापालिकेच्या वतीने ग्रंथयात्रा भरविण्याची तयारी सुरू असली तरी त्या कालावधीत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने ग्रंथयात्रा अडचणीत सापडली आहे. गेल्या वर्षभरापासून ग्रंथयात्रा भरविण्याचे नियोजन केले जात आहे परंतु ग्रंथयोग जुळून येण्यात अडथळे निर्माण होत आहेत.मागील वर्षी महापौर अशोक मुर्तडक व उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी अंदाजपत्रकात ग्रंथयात्रेसाठी खास २५ लाख रुपयांची तरतूद केलेली होती. त्यानुसार, मे महिन्यात सुटीच्या काळात दहा दिवसांसाठी ग्रंथयात्रा भरविण्याचे नियोजन होते. परंतु दुष्काळी स्थितीमुळे निर्णय स्थगित ठेवण्यात आला होता. त्यानंतर आता ग्रंथयात्रा दि. १४ ते २३ आॅक्टोबर या कालावधीत भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी गोल्फ क्लब मैदानावर भव्य वॉटरप्रूफ डोम उभारला जाणार आहे. सुमारे दोनशे प्रकाशक व ग्रंथविक्रेत्यांना त्यासाठी निमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले आहे. आता डोम व अन्य व्यवस्थेसाठी निविदाप्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू झाली असतानाच ग्रंथयात्रेवर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेचे सावट पुढे उभे ठाकले आहे. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी दीड महिना आचारसंहिता लागू राहणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता १५ आॅक्टोबरनंतर केव्हाही लागण्याची शक्यता असल्याने ग्रंथयात्रेवरही गंडांतर येऊ शकते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांकडून आचारसंहितेबाबत चाचपणी केली जात असून त्यानंतरच निविदाप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निविदाप्रक्रिया राबविण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी जाणार आहे. त्यानंतर मंजुरीचे सोपस्कार पार पडतील. तोपर्यंत आचारसंहितेचा कालावधी येऊन ठेपल्यास ग्रंथयात्रा भरविणे अवघड होऊन बसण्याची भीती पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. (प्रतिनिधी)