शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिंगाने आपटलं, पायाखाली तुडवलं अन्... मोकाट गायींचा माजी सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:16 IST

नाशिक जिल्ह्यात भटक्या जनावरांनी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका वृद्धावर हल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

Nashik Accident: मोकाट जनावरांच्या त्रासाने नागरिक हैराण झाल्याचे पाहायला मिळतात. कधी कधी भटक्या गुरांमुळे एखाद्याचा जीव देखील जातो. अशातच नाशिक जिल्ह्यातही भटक्या गायींनी रस्त्यावर एका वृद्धावर हल्ला केला. दोन गायींच्या भांडणावेळी एका गायीने रस्त्याने पायी जात असलेल्या वृद्धाला शिंगाने उचलून पायाखाली तुडवल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात आणखी एक व्यक्तीदेखील गंभीर जखमी झाली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्यामध्ये गायींनी केलेला भीषण हल्ला दिसून येत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आता मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

रस्त्याने जाणाऱ्या दोघा वृद्धांवर दोन गायींनी हल्ला केल्याची घटना सोमवारी कळवण-आतूर रोड येथे घडली. या हल्ल्यात सेवानिवृत्त महसूल अधिकारी भालचंद्र मालपुरे (७९, रा. कळवण) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आबा मोरे हे ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले. कळवण शहरातील जुना ओतूर रोड छत्रपती मंगल कार्यालय आणि आजूबाजूचा परिसर हा वर्दळीचा आहे. सोमवारी दोन गायींनी रस्त्यालगत उभ्या असलेल्या सेवानिवृत्त महसूल अधिकारी भालचंद्र मालपुरे यांना जोरदार धडक दिली. या हल्ल्याने ते खाली कोसळले. त्यानंतर गायींनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला चढवला. याचवेळी तिथे उभे असलेले आबा मोरे यांनाही गायींनी जखमी केले.

या घटनेमुळे परिसरात लोकांची धावपळ उडाली. भालचंद्र मालपुरे यांच्यावर हल्ला सुरु असताना बापू आहेर, आबा कानडे तसेच इतर उपस्थित लोकांनी या गायींना हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र गायींचा हल्ला सुरुच होता. त्यानंतर मालपुरे व मोरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मालपुरे यांचा मृत्यू झाला. मालपुरे हे महसूल विभागातील सेवानिवृत्त पुरवठा अधिकारी होते. तर जखमी आबा मोरे हे राज्य परिवहन महामंडळातील सेवानिवृत चालक आहेत.

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ७९ वर्षीय भालचंद्र रघुनाथ मालपुरे बाईकवरुन खाली उतरले. तितक्यात आधीच भांडत असलेल्या दोन मोकाट गायींनी त्यांच्यावर हल्ला केला. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. बराच वेळ गाय त्यांच्या शिंगांनी मालपुरे यांच्यावर हल्ला करत राहिली. त्यानंतर लोकांनी काठ्या घेऊन या गुरांना येथून हाकलून लावले. मालपुरे यांना गायींनी छातीवर, पोटावर बऱ्याच लाथा मारल्या. मालपुरे यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले, पण तोपर्यंत गायींनी त्यांना गंभीर जखमी केले होते. लोकांनी काठ्या आणि रॉडच्या मदतीने जनावरांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला, परंतु गायी अधिक आक्रमक झाली. त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांवरही हल्ला केला. यादरम्यान मालपुरे गंभीर जखमी झाले आणि ते जागीच पडले. लोकांनी त्यांना बाजूला केले आणि गायींना हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गायींनी आबा मोरे यांनाही गंभीर जखमी केले.

दरम्यान, या घटनेनंतर पोलीस, पालिका आणि पशुसंवर्धन विभागाने तपास सुरू केला आहे. भटक्या प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील असे अधिकाऱ्यांनीम्हटलं आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातPoliceपोलिसcowगाय