पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी १६ जुलैपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:41 IST2018-06-25T00:40:46+5:302018-06-25T00:41:09+5:30
तंत्रशिक्षण विभाग आणि सामाईक प्रवेश पूर्वपरीक्षा विभागातर्फे दहावीनंतर पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले असून १६ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार आहे.

पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी १६ जुलैपर्यंत मुदत
नाशिक : तंत्रशिक्षण विभाग आणि सामाईक प्रवेश पूर्वपरीक्षा विभागातर्फे दहावीनंतर पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले असून १६ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार आहे. तर थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी २५ जूनपासून १२ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहे. थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी १३ जुलैला प्रारूप गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. तंत्रशिक्षण विभागातर्फे दहावीनंतरच्या तंत्रनिकेतन अभ्यासक्रम प्रवेशासाठी २१ जूनपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना १६ जुलैला आॅनलाइन अर्ज नोंदणी करून ते निश्चित करता येणार आहे. तर १७ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, १८ ते २० जुलैला विद्यार्थ्यांना अर्जातील त्रुटी दुरु स्त करता येतील. २० जुलैपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना असून २१ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर याचदिवशी पहिल्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशीलही जाहीर करण्यात येणार आहे.
अशी होईल पहिली फेरी
२२ ते २५ जुलै- पहिल्या फेरीसाठी आॅप्शन फॉर्म भरणे
२६ जुलै- पहिल्या फेरीसाठी जागांचे वाटप
२७ ते ३० जुलै- एआरसी सेंटरवर प्रवेश निश्चित करण्याची संधी
दुस-या फेरीची प्रक्रिया
३१ जुलै- दुसºया फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे
१ ते ३ आॅगस्ट- दुसºया फेरीसाठी आॅप्शन फॉर्म भरण्याची संधी
४ आॅगस्ट- दुसºया फेरीसाठी जागा वाटप
५ ते ७ आॅगस्ट- एआरसी सेंटरवर प्रवेश निश्चित करण्याची संधी.