शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार्‍यांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:18 IST

पिंपळखुटे व भुलेगाव येथील शेतकर्‍यांनी मंगळवारपासून (दि. २३) येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर पाणी सोडण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. ...

पिंपळखुटे व भुलेगाव येथील शेतकर्‍यांनी मंगळवारपासून (दि. २३) येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर पाणी सोडण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. तर पाणी सोडू नये या मागणीसाठी डोंगरगाव, तळवाडे, पिंपळखुटे खुर्द व पिंपळखुटे बुद्रुक, भारम, कोळम, भुलेगाव आदी गावांतील शेतकर्‍यांनी डोंगरगाव धरणावर ठिय्या देत बुधवारपासून (दि. २४) आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

पाणी सोडण्याची मागणी करणार्‍या उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार दोनदा पाणी सोडण्याचा प्रयत्न अधिकार्‍यांनी केला, तर पाणी सोडू नका यासाठी शेकडो शेतकर्‍यांचा विरोध झाल्याने पाणी न सोडता अधिकार्‍यांना परतावे लागले होते. पाण्यावरून निर्माण झालेल्या या परस्पर विरोधी मागण्यांमुळे डोंगरगाव परिसरातील गावांमध्ये तणाव निर्माण झाला होता. तर स्थानिक पाटबंधारे विभागाचे अधिकारी पेचात सापडले होते.

दरम्यान, बुधवारी, (दि. २४) पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पाटील, सहायक अभियंता श्रीमती सरोदे यांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या उपस्थितीत दोन्ही बाजूच्या शेतकर्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत उपस्थित दोन्ही गटांना लेखी पत्र देण्यात आले. सदर पत्रावर दोन्ही गटांनी समाधान व्यक्त करत उपोषण आंदोलन स्थगित केले. आंदोलनकर्त्यांच्या वतीने भारम सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय सोमासे यांनी अधिकार्‍यांचे आभार मानले. उपस्थित शेतकर्‍यांनीही अधिकार्‍यांच्या योग्य भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी दत्तात्रय सोमासे, बाळासाहेब आरखडे, रामनाथ आरखडे, सुरेश कुर्‍हे, ज्ञानेश्वर सोमवंशी, संतोष राऊत, साईनाथ ढोकळे, रमेश ढोकळे, गौतम पगारे, साईनाथ मोहन, मारुती सोमासे, जालिंदर सोमवंशी, खलील पटेल, शकील पटेल, कचरू मोहन, दत्तू रोठे, माधव उंडे, पोपट मोहन, भाऊसाहेब सोमवंशी, साहेबराव सोमवंशी आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इन्फो

काय म्हटले आहे पत्रात?

डोंगरगाव तलावाची पार्श्वभूमी पाहता मागील वीस वर्षांपासून सदर चारीने सिंचनाचे आवर्तन देण्यात आलेले नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत चारीची दुरवस्था झालेली आहे. चारीचे बांधकाम नादुरुस्त झाले आहे. चारी बुजली आहे. त्यामुळे चारीने पाणी जाण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे पाणी मागणी अर्ज नमुना नंबर ७ नामंजूर करण्यात येत आहे. चारीचे काम सुरळीत झाल्यानंतर उपलब्ध पाणी साठ्यानुसार नियोजन करणे शक्य असल्याने उपोषण मागे घेण्यात यावे, असे पत्रात म्हटले आहे.

फोटो- २४ डोंगरगाव वॉटर

डोंगरगाव पाणीप्रश्नी दोन्ही गटांची झालेली बैठक.

===Photopath===

240221\24nsk_33_24022021_13.jpg

===Caption===

फोटो- २४ डोंगरगाव वॉटर डोंगरगाव पाणीप्रश्नी दोन्ही गटांची झालेली बैठक.