शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर दिले
3
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
4
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
5
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
7
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
8
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
9
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
10
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
11
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
12
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
13
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
14
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
15
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
16
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
17
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
18
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
19
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
20
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये तणाव निवळला

By admin | Updated: October 11, 2016 00:28 IST

जनजीवन पूर्वपदावर : शाळा, महाविद्यालये बंद; गृहराज्यमंत्र्यांची भेट

नाशिक : तळेगाव येथील अत्याचार प्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली आंदोलने आणि दगडफेकीमुळे निर्माण झालेला
तणाव निवळला असून, जनजीवन पूर्वपदावर येण्यास प्रारंभ झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गही सुरळीत सुरू झाला आहे. सोमवारी जिल्ह्याचा ग्रामीण भाग वगळता शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. रविवारी
रात्री उशिरापर्यंत तणावाच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी शाळा, महाविद्यालये
बंद होती. आंदोलकांनी केलेल्या शहर आणि ग्रामीण बसेसच्या नुकसानीमुळेबससेवा मात्र सोमवारीही बंद ठेवण्यात आली होती.
दरम्यान, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नाशिकमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पंधरा दिवसांच्या आत आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करू, असे स्पष्ट केले.
शनिवारी तळेगाव येथे बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याच्या घटनेनंतर जिल्हाभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. काही ठिकाणी शांततेत रास्ता रोको करण्यात आला तर काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ, दगडफेक अशी हिंसक आंदोलने झाली. त्यामुळे आत्तापर्यंत ३५ पोलीस जखमी झाले आहेत. सोमवारी शहरातील नाशिकरोड, गंगापूर यांसह काही भागात किरकोळ आंदोलने झाली. तर ग्रामीण भागात दिंंडोरी तालुका बंद ठेवून मूक मोर्चा काढण्यात आला. या व्यतिरिक्त कळवण, निफाड तालुक्यातील चांदोरी, विंचूर आणि नैताळे तसेच येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यातील वडाळभोई येथे रास्ता रोको आंदोलने करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये सुमारे वीस बसगाड्यांचे नुकसान झाल्याने शहर आणि लांबपल्ल्याच्या बससेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
सोमवारी सकाळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नाशिक येथे येऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सदर घटनेतील संबंधित आरोपीविरुद्ध पंधरा दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, असे केसरकर यांनी पत्रकारांना सांगितले. तर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी नाशिकमधील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि शांतता समिती सदस्यांची बैठक घेतली. शहरात जमावबंदी लागू करण्यात आली असून, राजकीय पक्षांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
(प्रतिनिधी)
जिल्ह्यातील मोबाइल इंटरनेट बंद
सोशल मीडियावर अफवांचा बाजार सुरू असून, तो रोखण्यासाठी पोलिसांनी नाशिक शहरासह जिल्ह्यातील सर्व मोबाइल इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. खासगी कंपन्या आणि बीएसएनएलने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार इंटरनेट बंद केल्याचे कळविले आहे. त्यामुळे मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियावर बंदी आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर दोन दिवस तात्पुरत्या स्वरूपात ही सेवा बंद असेल, असे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी सांगितले. मोबाइल बंदमुळे अनेकांचे हाल झाले असले, तरी यंत्रणेने उचललेल्या या पावलाचे सर्वसामान्यस्तरावर स्वागत करण्यात येत आहे.