शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

मनपाच्या बससेवेसाठी  मागविल्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 2:00 AM

शहर बस वाहतुकीसाठी अखेरीस महापालिकेने निविदा प्रसिद्ध केल्या असून, ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने दहा वर्षे स्वमालकीच्या बस चालविण्यासाठी ठेकेदारांना आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक : शहर बस वाहतुकीसाठी अखेरीस महापालिकेने निविदा प्रसिद्ध केल्या असून, ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने दहा वर्षे स्वमालकीच्या बस चालविण्यासाठी ठेकेदारांना आवाहन करण्यात आले आहे. ८ मार्चपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत असून, सर्व काही सुरळीत झाल्यास नव्या आर्थिक वर्षात बससेवेचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.  नाशिक महापालिकेने बससेवा चालविण्यास घेण्याचा प्रस्ताव आत्तापर्यंत सहा वेळा नाकारण्यात आला आहे, परंतु राज्यात आणि महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने ही सेवा बळजबरीने माथी मारण्यात आली आहे. विरोधी पक्षांचा विरोध बहुमतासमोर टिकला नाही. त्यामुळे दरवर्षी ही सेवा तोट्यात जाईल, असे मान्य करूनही महापालिकेने ही सेवा चालविण्यास घेण्याचे ठरवले आहे. बससेवेसाठी आग्रही असलेले माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनीदेखील ही सेवा तोट्यातच जाईल, अशी कबुली देऊनही शहरवासीयांसाठी सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय म्हणून बससेवेचा प्रस्ताव सादर केला होता. महापालिकेचा तोटा वाढू नये आणि किमान ना नफा ना तोटा तत्त्वावर बस चालवावी यासाठी महापालिकेने स्वत: बस किंवा कर्मचारी वर्गाचे दायित्व स्वीकारलेले नाही. तर ठेकेदार कंपनीला बस खरेदी, त्यांची देखभाल दुरुस्ती, वाहनचालक व इतर कर्मचारी वर्ग सर्व जबाबदारी ठेकेदाराची असणार आहे. महापालिकेच्या वतीने केवळ वाहक म्हणजेच कंडक्टर पुरवण्यात येणार असून, बससेवेसाठी खास काही पदे भरण्यात येणार आहेत. बससेवेसाठी मनपाच्या वतीने खास कंपनी गठित करण्यात आली असून, या कंपनीला बससेवेचे सर्वाधिकार असतील. मनपा मात्र फक्त बससेवेतील तोटा भरण्यासाठीच सहभाग देणार आहे.गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात महासभेत बससेवेचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यावेळी बससेवेसाठी परिवहन समिती स्थापन करण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे त्यात बदल करावा लागला आणि बस कंपनी स्थापन करण्याचा ठराव करण्यात आला. दरम्यान, तुकाराम मुंढे यांची बदली होईपर्यंत सत्ताधाऱ्यांनी प्रस्ताव रोखून ठेवला होता. राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती झाल्यानंतर पंधरा दिवसांनी हा ठराव देण्यात आला त्यानंतर आता त्यासंदर्भात निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे.दहा वर्षांसाठी बससेवामहापालिकेने शहर बससेवेसाठी खरेदी, व्यवस्थापन, संचलन व देखभाल करण्यासाठी एकूण दहा वर्षे कालावधीसाठी निविदा काढण्यात आली आहे. यात एकूण चारशे बस या ठेक्यात अंतर्भूत असून प्राधान्य सर्व सीएनजी बससाठीच आहे. त्या कमी पडल्या तर डिझेल बस वापरात येणार आहे. शिवाय एका मॅकेनिझमवरच अवलंबून राहणे सोपे नसल्याने दोन पर्याय सुचविण्यात आले आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक