शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

मनपात आता निविदा समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 01:10 IST

महापालिकेत निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी आता आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी समितीची मात्रा शोधून काढली आहे. त्यानुसार आता निविदांच्या अटी-शर्ती शोधून सर्व प्रकारची कार्यवाही आता या समितीमार्फत केली जाणार आहे.

नाशिक : महापालिकेत निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी आता आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी समितीची मात्रा शोधून काढली आहे. त्यानुसार आता निविदांच्या अटी-शर्ती शोधून सर्व प्रकारची कार्यवाही आता या समितीमार्फत केली जाणार आहे. याबरोबरच सदर समितीच निविदेबाबत सर्व निर्णय घेणार असून तसे अधिकार समितीला बहाल करण्यात आले आहे.महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यासंदर्भात समितीचा निर्णय घेतला आहे. समितीत अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखापाल, मुख्य लेखा परीक्षक आणि विभागप्रमुखांचा समावेश असणार आहे. ही समितीच निविदेबाबत सर्व निर्णय घेणार असल्याचे यासंदर्भात गमे यांनी पत्रकारांना सांगितले.महापालिकेत सध्या बऱ्याच प्रमाणातील निविदा वादग्रस्त ठरल्या आहेत. यात प्रामुख्याने पेस्टकंट्रोल ठेका, पाठोपाठ आउटसोर्सिंग ठेका वादात सापडला आहे. तीन वर्षांपूर्वी महापालिकेने पेस्टकंट्रोलचा ठेका दिला, त्यावेळी त्याची किंमत १९ कोटी रुपये होती. मात्र, नंतर तीन वर्षांनंतर हा ठेका ३९ कोटी रुपयांपर्यंत गेल्याने त्याविषयी शंका उपस्थित करण्यात आल्या. तीन वर्षांत असे काय घडले की, त्याची रक्कम एकदम दुपटीने वाढली असा नगरसेवकांचा प्रश्न होता. त्यानंतर आयुक्तांनी मुख्य लेखा परीक्षकांकडे हे प्रकरण पाठविले आणि त्याची छाननी करण्यास सांगितले. शहरात डेंग्यूचा प्रश्न गंभीर असताना नव्या ठेक्याला अद्याप मुहूर्त मिळाला नसून सध्या जुन्याच ठेकेदाराकडून काम करून घेतले जात आहे.अलीकडेच आउटसोर्सिंगचा ठेकादेखील वादग्रस्त ठरला आहे. सातशे सफाई कामगार पुरवण्यासाठी ७७ कोटी रुपयांचा ठेका काढल्यानंतर त्यावरदेखील बरेच वाद झाले आहेत. महापालिकेने किमान वेतन कायद्याप्रमाणे निविदेच्या अटी-शर्ती ठरवल्या होत्या. त्यामुळे निविदेची किंमत वाढल्याचे नमूद करण्यात करण्यात आले असले तरी लेखा परीक्षकांनी आधी अपात्र ठरविलेल्या ठेकेदाराला नंतर पात्र ठरविण्याचा प्रकार घडल्याने त्यातून वाद झाले होते.आता हे प्रकरणदेखील महापालिकेचे अतिरिक्तआयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सोपविण्यात आले आहे. सेंट्रल किचनची निविदा वादग्रस्त ठरली असून, त्यात बचत गटांना सामावून घेण्याऐवजी अनेक बड्या ठेकेदारांना कामे देण्यात आले आहे.दोन ठेक्यांबाबत अद्याप निर्णय होईना !महापालिकेतील पेस्टकंट्रोल आणि आउटसोर्सिंगचा ठेका वादात सापडल्यानंतर त्याची चौकशी सध्या सुरू आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक