नाशिकमध्ये सराईत चोरट्याकडून चोरीच्या दहा सायकली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 20:54 IST2018-02-19T20:47:40+5:302018-02-19T20:54:47+5:30
नाशिक : शहरातील सायकली चोरून विकणा-या संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली असून त्याच्याकडून ६० हजार रुपयांच्या चोरीच्या दहा सायकली जप्त केल्या आहेत़ प्रतिक राजेंद्र पाठक (१८, रा़भगतसिंग चौक, खालचे चुंचाळे, अंबड, नाशिक) असे या सायकलचोराचे नाव आहे़

नाशिकमध्ये सराईत चोरट्याकडून चोरीच्या दहा सायकली जप्त
नाशिक : शहरातील सायकली चोरून विकणा-या संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली असून त्याच्याकडून ६० हजार रुपयांच्या चोरीच्या दहा सायकली जप्त केल्या आहेत़ प्रतिक राजेंद्र पाठक (१८, रा़भगतसिंग चौक, खालचे चुंचाळे, अंबड, नाशिक) असे या सायकलचोराचे नाव आहे़
शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस नाईक मोतीलाल महाजन यांना अंबड परिसरातील एक इसम महागड्या सायकली कमी किमतीत विकत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार युनिट दोनने संशयित प्रतिक पाठक यास ताब्यात घेतले व पोलीसी खाक्या दाखवून चौकशी केल्यानंतर त्याने अंबड पोलीस ठाणे हद्दीतून सायकली चोरल्याची माहिती दिली़ त्याच्याकडून चोरीच्या तब्बल दहा सायकली ५९ हजार ८०० रुपयांचा जप्तही करण्यात आल्या आहेत़ सायकलचोरीचा एक गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात रविवारी दाखल आहे़
गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र सहारे, विजय लोंढे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव, पोलीस हवालदार रमेश घडवजे, श्रीराम सपकाळ, राजाराम वाघ, पोलीस नाईक संजय ताजणे, देवकिसन गायकर, परमेश्वर दराडे, नितीन भालेराव, राहुल सोळसे, पोलीस शिपाई योगेश सानप, बाळा नांद्रे, जयंत शिंदे, यादव डंबाळे, महेंद्र साळुंखे, विजय पगारे यांनी ही कामगिरी केली़
सिडकोत मद्यसाठा जप्त
सिडकोतील संभाजी स्टेडियमच्या पानटपरीजवळ अवैध दारू विक्री करणा-या संशयित संजू रामगरीब कोरी (रा़बाजीप्रभू चौक, सिडको) यास गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे़ पोलीस हवालदार राजाराम वाघ व पोलीस शिपाई बाळा नांद्रे यांनी याबाबत माहिती मिळाली होती़ संशयित कोरीकडून खताच्या गोणीमध्ये ठेवलेल्या ४ हजार ७३२ रुपयांच्या दारूच्या १८२ बाटल्या जप्त करून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला़