टेम्पो दरीत कोसळताना थोडक्यात बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:09 IST2018-10-27T01:09:09+5:302018-10-27T01:09:48+5:30

सप्तशृंगगडावरील गणेश घाटात चालकाचा ताबा सुटल्याने आयशर टेम्पो पाचशे ते सातशे फूट खोल दरीत जाता जाता बचावला.

Tempo escaped briefly in the valley | टेम्पो दरीत कोसळताना थोडक्यात बचावला

टेम्पो दरीत कोसळताना थोडक्यात बचावला

सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावरील गणेश घाटात चालकाचा ताबा सुटल्याने आयशर टेम्पो पाचशे ते सातशे फूट खोल दरीत जाता जाता बचावला.
नवरात्रोत्सव यात्रेत साहित्याचे दुकान लावण्यासाठी नाशिक येथील काही व्यावसायिक गडावर आले होते. यात्रा संपल्याने उरलेला माल व इतर साहित्य नाशिक येथे परत घेऊन जाण्यासाठी टेम्पो (क्र. एमएच १५ बीजे ३८९०) करण्यात आला. टेम्पो गडावरून खाली येत असताना नागमोडी घाट वळण रस्ता
उतरत असताना वळणावर वाहन चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पोचा अपघात झाला. सुदैवाने वळणावर लोखंडी बॅरिकेड्स असल्याने टेम्पो त्याला अडकला. कोणतीही जीवितहान्ी झाली नाही. टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
टेम्पोमध्ये चालकासह सहा व्यावसायिक प्रवास करत होते. पोलीस कॉन्स्टेबल योगेश गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. वाहन चालकावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती आहे.



 

Web Title: Tempo escaped briefly in the valley