शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक-शिक्षकेतरांची ‘वेतनकोंडी’

By admin | Updated: March 3, 2017 01:44 IST

पाथर्डी फाटा : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये वेतन खाते असलेल्या शिक्षकांना अजूनही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 पाथर्डी फाटा : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये वेतन खाते असलेल्या शिक्षकांना अजूनही अडचणींचा सामना करावा लागत असून, बँकेच्या गोंधळी कारभारामुळे शिक्षकांमध्ये नारजी व्यक्त केला जात आहे. शिक्षकांच्या आर्थिक व्यवहारांसाठी बँकेचे पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी शहर व जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केली आहे. पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्हा सहकारी बँकेच्या व्यवहारांवरही निर्बंध घातले होते. शहर व जिल्ह्यातील जवळपास सर्वच अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचे पगाराचे खाते या बँकेच्या विविध शाखांमध्ये असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यांचे पगाराचे पैसे अडकून पडले आहेत. कधी पाचशे, हजार, दोन हजार, दहा हजार एवढेच पैसे बँकेतून काढता येत आहेत.क्वचितच काही शाखांमध्ये दहा दिवसाला चोवीस हजार मिळतात. ही रक्कम काढण्यासाठी बँकेच्या गर्दीत तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. शाळेची वेळ अन् बँकेच्या कामकाजाची वेळ एक असल्याने रजा घेऊन अथवा शाळा बुडवून बँकेत जावे कसे अन् किती वेळा जावे अशा कात्रीत शिक्षक सापडले आहेत.धनादेशाद्वारे व्यवहार करण्यासाठी चेकबुक मिळावे म्हणून महिना दीड-महिन्यांपासून विनंती अर्ज करूनही धनादेश पुस्तक मिळत नाहीत. आरटीजीसीने अन्य बँकांच्या खात्यात पैसे वळते करायला घ्यावेत तर या बँकेची ती पद्धत त्यातही अडचणी असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. चेकबुक, आरटीजीएस या सुविधाही वेळेवर मिळत नसल्याने अडचणींमध्ये अधिक भर पडत आहे. आरटीजीएस त्याच शाखेत होत नाही. शाखेत केवळ फॉर्म भरून चेक जमा करून प्रक्रि या सुरू केली जाते.नाशिक येथील मध्यवर्ती कार्यालयाला शाखा एखाद्या कर्मचाऱ्यांमार्फत अन्य टपालासोबत आरटीजीएसची कागदपत्रेही पाठवते. तेथून अधिकारी सोयीने अधिकारी कार्यवाही सुरू करतात. या सर्व प्रकाराला बऱ्याचवेळा आठवडा किंवा त्याहून अधिक वेळ लागत असल्याचा अनुभव बँकेचे कर्मचारी व शिक्षकांनाही येत आहे. या सर्व कालापव्ययामुळे शिक्षकांना आर्थिक नुकसानीसह मनस्तापही सहन करावा लागतो आहे. (प्रतिनिधी)