शिक्षण मंडळाच्या निर्णयावर शिक्षक संघाची नाराजी
By Admin | Updated: January 19, 2016 23:33 IST2016-01-19T23:30:34+5:302016-01-19T23:33:38+5:30
शिक्षण मंडळाच्या निर्णयावर शिक्षक संघाची नाराजी

शिक्षण मंडळाच्या निर्णयावर शिक्षक संघाची नाराजी
नााशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागातील नाशिक, धुळे नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांतील अडीच हजार शाळांना नाशिक विभागीय मंडळाची कायम मान्यता घेण्याचे आदेश काढल्याने माध्यमिक शिक्षक संघाने नाराजी व्यक्त केली आहे.
मंडळाच्या आदेशाप्रमाणे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून तपासणी करून त्यांच्या शिफारशीचे प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयात सादर केल्यानंतर त्यांच्या शिफारशीचा प्रस्ताव मंडळात दाखल करावा लागणार आहे. अशा प्रकारचे प्रस्ताव तयार करून ते मंडळाकडे सादर करणे व मंडळाची मंजुरी मिळविणे ही अतिशय खर्चिक बाब असल्याचे सांगत माध्यमिक शिक्षक संघाने मंडळाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच विभागीय मंडळाने मान्यता घेण्यासंबंधीचे आदेश मागे घेऊन मुख्याध्यापकांकडून शुल्क न आकारता त्यांच्याकडून हमीपत्र घेऊन कायमस्वरूपी मंडळ मान्यता देण्यात यावी, अशी मागणी माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष फिरोज बादशाह, नाशिक जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष कैलास देवरे, कार्यवाह रवींद्र मोरे, जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष आर. डी. निकम, कार्यवाह टी. एम. डोंगरे, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एसबी शिरसाठ, कार्यवाह बी. एस. देशमुख आदिंनी
के ली आहे. (प्रतिनिधी)