पाण्याच्या टाकीत पडून शिक्षकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 01:46 AM2020-02-14T01:46:35+5:302020-02-14T01:46:57+5:30

सुरगाणा तालुक्यातील गुही येथील वनवासी कल्याण आश्रमशाळेतील पाण्याच्या टाकीत पडून शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

Teacher's death after falling into a tank | पाण्याच्या टाकीत पडून शिक्षकाचा मृत्यू

पाण्याच्या टाकीत पडून शिक्षकाचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देसुरगाणा तालुक्यातील घटना

सुरगाणा : तालुक्यातील गुही येथील वनवासी कल्याण आश्रमशाळेतील पाण्याच्या टाकीत पडून शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
सटाणा तालुक्यातील पिंपळकोठे येथील राजेंद्र यशवंत कापडणीस (४८) हे गुही आश्रमशाळेत तेवीस वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवारी वीज नव्हती. रात्री वीज आल्यामुळे गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान पाण्याची टाकी भरली की नाही ते पाहून येतो असे त्यांची पत्नी व वडील यांना सांगून कापडणीस हे टाकीकडे गेले. मात्र बराच काळ होऊनही ते घरी न परतल्याने त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीत मिळून आला. टाकीत किती पाणी भरले हे पहात असताना त्यांचा तोल जाऊन ते टाकीमध्ये पडले असावेत, असा अंदाज आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
कापडणीस यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजेंद्र कापडणीस यांच्यावर सटाणा तालुक्यातील पिंपळकोठे या त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरगाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.अधिक तपास पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पवार करीत आहेत.

Web Title: Teacher's death after falling into a tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.