तात्यासाहेबांच्या स्मृती आजही जिवंत :  वसंत डहाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 01:06 AM2019-02-28T01:06:12+5:302019-02-28T01:06:53+5:30

तात्यासाहेब असताना मी नेहमी या वास्तुत येत असे. येथे आमच्या बैठका होऊन मराठी साहित्याविषयीच्या चर्चा घडत होत्या. दुर्दैवाने तात्यासाहेब आज नाहीत, मात्र या वास्तुत त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत

 Tatyasaheb's memory still alive: Spring Dahake | तात्यासाहेबांच्या स्मृती आजही जिवंत :  वसंत डहाके

तात्यासाहेबांच्या स्मृती आजही जिवंत :  वसंत डहाके

Next

नाशिक : तात्यासाहेब असताना मी नेहमी या वास्तुत येत असे. येथे आमच्या बैठका होऊन मराठी साहित्याविषयीच्या चर्चा घडत होत्या. दुर्दैवाने तात्यासाहेब आज नाहीत, मात्र या वास्तुत त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत. त्यांचे निवास्थान स्मृतींनी भारावलेले आहे, असे मत जनस्थान पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ लेखक व कवी वसंत डहाके यांनी व्यक्त केले.
प्रख्यात कवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून बुधवारी (दि.२७) सर्वत्र साजरा करण्यात आला. यानिमित्ताने डहाके यांनी सपत्नीक कुसुमाग्रज प्रतिष्ठानसह कुसुमाग्रज स्मारकाला भेट दिली. यावेळी डहाके दाम्पत्याने कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. तसेच प्रतिष्ठानमधील त्यांच्या बैठक खोलीला भेट देत तात्यासाहेबांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंचा ठेवा न्याहाळत स्मृतींना उजाळा दिला. यावेळी त्यांच्यासोबत कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक उपस्थित होते. यावेळी डहाके यांनी आपला अभिप्राय प्रतिष्ठानच्या नोंदवहीत नोंदविला.

Web Title:  Tatyasaheb's memory still alive: Spring Dahake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.