Tanisha Kotecha's selection in the Indian Table Tennis Team | भारतीय टेबल टेनिस संघात नाशिकच्या तनिषा कोटेचाची निवड 
भारतीय टेबल टेनिस संघात नाशिकच्या तनिषा कोटेचाची निवड 

ठळक मुद्देनाशिकच्या तनिषा कोटेचाला राष्ट्रीय संघात संधी मस्कत येथील जागतिक टेबल टेनीस स्पर्धेसाठी निवड

नाशिक : मस्कत येथे होणाऱ्या जागतिक जुनिअर सर्किट ओमान जुनिअर अ‍ॅण्ड कॅडेट स्पर्धेसाठी भारतीय मुलींच्या संघाचत नाशिकच्या तनिषाची कोटेचा हिची निवड झाली. तिच्या समवेत हरियाणाची सुहाना सैनी हिलाही या संघात स्थान मिळाले करण्यात आहाले.
ओमानमधील मस्कत शहरात  दि. २४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या  जागतिक या स्पर्धेत भाग घेणाऱ्या टेबल टेनिस पटूंचे प्रशिक्षण सराव शिबीर आॅस्ट्रेलियन प्रशिक्षक ब्रेट क्लार्क  तसेच भारतीय प्रशिक्षक सुबीन कुमार व सुब्रतो बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली पटियाला येथे पूर्ण झाले आहे. या स्पर्धेत आपले स्थान निश्चित करणाऱ्या तनिषाला सब जुनिअर मुलींच्या गटात राष्ट्रीय स्तरावर दुसरे मानांकन मिळालेले असून तिने या वर्षीच्या तीन राष्ट्रीय स्पर्धेत दोनवेळा अंतिम फेरी गाठून रौप्य पदक पटकावले आहे. तर एकदा कांस्य पदकावर तिला समाधान मानावे लागले होते. नासिक जिमखाना येथे तनिषाने टेबल टेनिस व शारीरिक व्यायामाचे नियमित सराव केला असून  तिच्या निवडीने नाशिकच्या क्रीडाप्रमींमध्ये उत्साह  संचारला आहे. 


Web Title: Tanisha Kotecha's selection in the Indian Table Tennis Team
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.