तलाठी परीक्षा; कागदपत्रे तपासणीची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:57 AM2019-07-13T01:57:42+5:302019-07-13T01:59:25+5:30

गेल्या २ जुलैपासून सुरू झालेल्या तलाठी पदासाठीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी कसोटीची ठरत आहे. परीक्षेच्या अर्ध्या तास आगोदर पोहचण्याची सक्ती आणि पुरावे म्हणून सादर केलेल्या ओळखपत्रे अनेकविध कारणांनी नाकारले जात असल्याने काही विद्यार्थी परीक्षेला मुकले असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

Talathi Examination; Test for documents check | तलाठी परीक्षा; कागदपत्रे तपासणीची कसोटी

तलाठी परीक्षा; कागदपत्रे तपासणीची कसोटी

Next
ठळक मुद्देविद्यार्थी मुकले : वेळेच्या मर्यादेचाही फटका

नाशिक : गेल्या २ जुलैपासून सुरू झालेल्या तलाठी पदासाठीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी कसोटीची ठरत आहे. परीक्षेच्या अर्ध्या तास आगोदर पोहचण्याची सक्ती आणि पुरावे म्हणून सादर केलेल्या ओळखपत्रे अनेकविध कारणांनी नाकारले जात असल्याने काही विद्यार्थी परीक्षेला मुकले असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
महाराष्टÑ शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या तलाठी महाभरती परीक्षेला गेल्या २ पासून प्रारंभ झाला आहे. शहरातील विविध सहा केंद्रांवर अठरा दिवस सदर परीक्षा घेतली जात आहे. ६१ जागांसाठी सुमारे ३० हजारांच्या जवळपास अर्ज आल्याने परीक्षेचा कालावधी वाढला असून, एका केंद्रावर दररोज किमान १५० ते २०० विद्यार्थ्यांची परीक्षा देत आहेत.
सकाळी १० ते १२, दुपारी २.३० ते ४.३० या कालावधीत सदर परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेला येणाºया उमेदवाराला ओळख म्हणून एखादे ओळखपत्र सादर करावे लागते. गेल्या गुरुवारी म्हसरूळ येथील केंद्रावर सकाळच्या सत्रात काही विद्यार्थ्यांना परीक्षेलाच बसू दिले जात नसल्याची तक्रारी आहेत. एका महिला उमेदवाराच्या परीक्षा हॉल तिकिटावर लग्नानंतरचे तर आधार कार्डावर लग्नापूर्वीचे नाव असल्याने सदर महिलेस परीक्षेला बसण्यास अपात्र ठरविण्यात आले.
सदर महिला उमेदवाराकडे पुरावा म्हणून अन्य ओळखपत्र किंवा लग्नाचे प्रमाणपत्रही मागण्यात आले. परंतु धावपळीत प्रमाणपत्र घेऊन येण्यास विलंब होणार असल्याने संबंधित महिलेला परीक्षेस मुकावे लागले.
याच केंद्रावर एका उमेदवाराकडे असलेले पॅनकार्डचे रंगीत झेरॉक्स असलेले ओळखपत्र नाकारण्यात आले. ओरिजन ओळखपत्र सादर करू न शकल्याने त्यासही परीक्षेला बसू देण्यात आले नाही अशी तक्रार आहे.
—इन्फो—
उमेदवारांनी परीक्षेच्या ९० मिनिटे आधी किंवा ३० मिनिटे अगोदर केंद्राच्या आवारात असावे, असा परीक्षेसाठीचा नियम आहे. सकाळी ९.३० वाजता केंद्राचे प्रवेशद्वार बंद करण्यात येते. त्यानंतर आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, असा नियम असल्याने या नियमाचादेखील अनेकांना फटका बसत आहे. धावपळ करीत प्रवेश केंद्रापर्यंत पोहचूनही प्रवेशद्वार बंद असल्यामुळे त्यांना परतावे लागते.

Web Title: Talathi Examination; Test for documents check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.