शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार प्रकरणात तलाठ्याला ५ वर्ष सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:14 IST

नाशिक : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील तलाठी मनोज किसन नवाळे याला १३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंध ...

नाशिक : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील तलाठी मनोज किसन नवाळे याला १३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये पाच वर्ष सक्तमजुरी व १०हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणातील तक्रारदार यांचे आई व वडिलांनी ब्राह्मणवाडे शिवारात १० गुंठे शेती विकत घेतली होती.

त्याबाबत महसुली दप्तरात नोंद घेण्यासाठी तलाठी मनोज नवाळेने तक्रारदारांकडे १३ हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात (एसीबी) तक्रार दिली. त्यानंतर १४ ऑगस्ट २०१३ ला एसीबीच्या पथकाने पडताळणी करून सापळा रचून मनोज नवाळेला लाचेची रक्कम पंच साक्षीदारांसमक्ष स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणात १५ ऑगस्ट २०१३ गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते. या घटल्यात शुक्रवारी (दि. ०५) अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. नायर यांनी निकाल देताना मनोज नवाळे याला भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवत ५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने

कारावासाची शिक्षा सुनावली आहे.