घोडेस्वारीत नाशिकच्या सैयद समदला सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 00:04 IST2021-02-03T22:50:01+5:302021-02-04T00:04:40+5:30
नाशिक : जयपूर येथे नुकत्याच झालेल्या घोडेस्वारी स्पर्धेमध्ये नाशिकच्या सैयद असद समद याने महाराष्ट्राच्या संघाकडून खेळत ६० किलोमीटरसाठी क्वालिफाय होत सुवर्णपदक मिळवत स्पर्धा जिंकली.

घोडेस्वारीत नाशिकच्या सैयद समदला सुवर्णपदक
ठळक मुद्देनाशिकच्या इतिहासात एक नवीन मानाचा तुरा
नाशिक : जयपूर येथे नुकत्याच झालेल्या घोडेस्वारी स्पर्धेमध्ये नाशिकच्या सैयद असद समद याने महाराष्ट्राच्या संघाकडून खेळत ६० किलोमीटरसाठी क्वालिफाय होत सुवर्णपदक मिळवत स्पर्धा जिंकली.
त्याच्या रुपाने नाशिकच्या इतिहासात एक नवीन मानाचा तुरा रोवला गेला आहे. ही स्पर्धा जयपूर येथील मंगलम सिटी सागर इक्वेस्टेरीयन स्पोर्टस अकॅडमीच्यावतीने घेण्यात आली. ही संस्था नेहमी घोडेस्वारीच्या स्पर्धा घेत असते. नाशिकच्या सैयद समदला जालीगुरु हॉर्स रायडर स्कूलचे वैभव सैयद तौसिफ, अल्बर्ट आदींचे मार्गदर्शन लाभले. (फोटो स्कॅनला दिला आहे.)